Local Body Elections : मतमोजणी लांबणीवर! हायकोर्टाने नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली; आयोगाला जोरदार दणका

Bombay High Court Nagpur bench : आता 21 डिसेंबरलाच राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.
Local-Body-Elections
Local-Body-ElectionsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra local body elections : राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २४ नगराध्यक्ष आणि १५४ जागांवरील निवडणूक स्थगित केल्यानंतर आता निकालाबाबतही मोठी बातमी समोर आली आहे. आयोगाच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये आज होत असलेल्या मतदानाचा निकालही पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी हायकोर्टाने मान्य केली आहे.

नागपूर खंडपीठात आज मतमोजणीबाबत सुनावणी झाली. यामध्ये हायकोर्टाने आयोगाला झटका दिला आहे. आज सुरू असलेल्या निवडणुकांसाठीच्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती. पण हायकोर्टाने २१ डिसेंबरलाच सर्व मतमोजणी घेण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या सुधारित कार्य़क्रमानुसार २४ अध्यक्षपदांच्या आणि विविध ठिकाणच्या १५४ सदस्यपदाच्या जागांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर २१ डिसेंबरला मतमोजणी आहे.

आता 21 डिसेंबरलाच राज्यातील सर्व २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. तसेच २० डिसेंबरनंतरच एक्झिट पोलही प्रसिध्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आज एक्झिट पोल प्रसिध्द होणार नाहीत. आज सुरू असलेल्या मतदानाचा उद्या निकाल लावल्यास त्याचा नकारात्मक, सकारात्मक परिणाम पुढील निवडणुकांवर होऊ शकतो, अशी बाजू याचिकाकर्त्यांनी कोर्टात मांडली होती. ते न्यायालयाकडून मान्य करण्यात आले.

Local-Body-Elections
Election Commmission : निवडणूक आयोगाकडून अधिकृत यादी प्रसिध्द; राज्यातील ‘या’ 24 नगराध्यक्ष अन् 154 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान… 

आतापर्यंत काय घडलं?

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय २३ नोव्हेंबर रोजी किंवा त्यानंतर आल्याने संबंधित ठिकाणी सुधारित कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अध्यक्षपदासंदर्भातील अपिलांचा निकाल उशिरा आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या संपूर्ण क्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया सुधारीत कार्यक्रमानुसार राबविली जाईल. अध्यक्षपदासोबतच सदस्यपदांची एकत्रित निवडणूक घेण्याची कायद्यात तरतूद आहे. ज्या ठिकाणच्या सदस्यपदासाठी अपील होते, तिथे मात्र फक्त त्या जागेपुरताच सुधारित निवडणूक कार्यक्रम राबविला जाईल.

अपील कालावधीनंतरच्या टप्प्यांसाठीच्या सुधारित कार्यक्रमानुसार आता १० डिसेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप ११ डिसेंबरला होईल. ता. २० डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २१ डिसेंबरला सकाळी १० वाजता सुरू होईल.

Local-Body-Elections
Rajya Sabha Session Live : समोरच्या बाकावर बसून PM मोदी ऐकत होते, खर्गेंनी संधी साधली अन् सभापतींना म्हणाले, तिकडं बघू नका, धोका आहे!

अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे : ठाणे- अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा, पुणे- बारामती व फुरसुंगी उरुळी देवाची, सोलापूर- अनगर व मंगळवेढा, सातारा- महाबळेश्वर व फलटण, छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री, नांदेड- मुखेड व धर्माबाद, लातूर- निलंगा व रेणापूर, हिंगोली- वसमत, अमरावती - अंजनगाव सूर्जी, अकोला- बाळापूर, यवतमाळ- यवतमाळ, वाशीम- वाशीम, बुलढाणा- देऊळगाव राजा, वर्धा- देवळी, चंद्रपूर- घुग्घूस.

सुधारित कार्यक्रमानुसार निवडणूक होत असलेल्या ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांची यादी : अमरावतीः अचलपूर-२, दर्यापूर-१, धारणी-२ व वरूड-१. अहिल्यानगरः जामखेड-२, राहुरी-१, शिर्डी-१, शेवगाव-३, श्रीगोंदा-१, श्रीरामपूर-१ व संगमनेर-३. कोल्हापूरः गडहिंग्लज-१. गडचिरोलीः आरमोरी-१ व गडचिरोली-३. गोंदियाः गोंदिया-३ तिरोडा-१. चंद्रपूरः गडचांदूर-१, बल्लारपूर-१, मूल-१ व वरोरा-१. छत्रपती संभाजीनगरः गंगापूर-२, पैठण-४ व वैजापूर-२. जळगावः अंमळनेर-१, पाचोरा-२, भुसावळ-३, यावल-१, वरणगाव-२ व सावदा-३. जालनाः भोकरदन-२. ठाणे: बदलापूर-६. धाराशिवः उमरगा-३ व धाराशिव-३. नांदेडः कुंडलवाडी-१, भोकर-१ व लोहा-१. नागपूरः कामठी-३, कोंढाळी-२, नरखेड-३ व रामटेक-१. नाशिकः ओझर-२, चांदवड-१ व सिन्नर-४. परभणीः जिंतूर-१ व पुर्णा-२. पालघरः पालघर-१ व वाडा-१. पुणेः तळेगाव-६, दौंड-१, लोणावळा-२ व सासवड-१. बीडः अंबेजोगाई-४, किल्ले धारूर-१ व परळी-५. बुलढाणाः खामगाव-४, जळगाव जामोद-३ व शेगाव-२. भंडाराः भंडारा-२. यवतमाळः दिग्रस-३, पांढरकवडा-२ व वणी-१. रत्नागिरीः रत्नागिरी-२. लातूरः उद्‌गीर-३. वर्धाः पुलगाव-२, वर्धा-२ व हिंगणघाट-३. वाशीमः रिसोड-२. सांगलीः शिराळा-१. सातारा: कराड-१ व मलकापूर-२. सोलापूरः पंढरपूर-२. बार्शी-१, मैंदर्गी-१, मोहोळ-२ व सांगोला-२ आणि हिंगोली: हिंगोली-२.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com