Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting, 20 May: मुंबई उत्तर पश्चिमचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनंतर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा आरोप केला. "जसे उद्धव ठाकरे आज अमोल कीर्तीकरांसाठी लढत आहेत तसे कधी ते माझ्यासाठी आलेच नाहीत," असा आरोप वायकरांनी केला.
मी ज्यावेळी निवडुका लढवल्या त्यावेळी माझ्यासाठी उद्धव ठाकरे कधी आलेच नाहीत. जेवढं सहकार्य अमोल कीर्तीकरांना मिळाले तेवढं मला कधी मिळालं नाही. मी इथे एकटाच लढलो, माझ्यासाठी कोणी नेता नव्हता, मीच नेता, मीच शिवसैनिक आणि मीच कार्यकर्ता," अशी खदखद वायकरांनी व्यक्त केली.
ईडी चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी काही दिवसापूर्वी वायकरांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. जोगेश्वरीतील राखीव भूखंडावर हॉटेल उभारून आर्थिक लाभ घेतल्याप्रकरणी गेल्या काही महिन्यापासून ईडीचा ससेमिरा वायकरांच्या मागे होता.
या प्रकरणी ईडीने वायकरांना अनेकदा चौकशीसाठी बोलाविले होते. या चौकशीला कंटाळून वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचे बोलले जाते. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून (Mumbai North-West Lok Sabha Election Voting) अमोल किर्तीकर मैदानात आहेत.
किर्तीकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली आहे. किर्तीकरांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत.अमोल किर्तीकरांना उद्धव ठाकरे यांनी प्रचारात मदत केली, तशी मदत आपल्याला केली नाही, अशी खंत वायकर यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.