Mumbai North-West Lok Sabha Election Voting : वडिलांची उणीव नक्कीच भासते! मतदान करताना अमोल किर्तीकर भावूक

Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE updates in Marathi: . मतदान केल्यानंतर त्यांनी भाजपचे नेते, माजी मंत्री राम नाईक यांची भेट घेतली. गोरेगाव मतदान केंद्रावर दोघांची भेट झाली. अमोल यांनी राम नाईक यांचे आशीर्वाद घेतले.
Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Amol Kirtikar Vs Ravindra WaikarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha election 2024 20 May: राज्यातल्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांसह महापालिका संबंधित सरकारी यंत्रणांकडून विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचा आवाहन करण्यात येत आहे. राज्यात शेवटच्या टप्यात 13 जागांवर मतदान सुरू आहे. मुंबईत सहा जागांसाठी मतदान होत आहे.

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात (Mumbai North-West Lok Sabha Election Voting) ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या वेळी त्यांनी आपले वडील विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांची आठवण झाली.

गजानन किर्तीकर हे शिंदे गटात आहेत. नेहमीप्रमाणे आज वडील आपल्यासोबत मतदानास नव्हेत, यांची खंत अमोल किर्तीकर यांनी व्यक्त केली. "वडिलांची उणीव नक्कीच भासते," अशा शब्दात अमोल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"ते आज शिंदे गटात आहे मी ठाकरे गटात आहे. ते जरी आज माझ्यासोबत नसले तरी त्यांच्या वयाचे अनेक जणं माझ्यासोबत आहेत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये विक्रमी मतदान होईल, ४ लाख मतांनी माझा विजय होईल," असे अमोल किर्तीकर म्हणाले. मतदान केल्यानंतर त्यांनी भाजपचे नेते, माजी मंत्री राम नाईक यांची भेट घेतली. गोरेगाव मतदान केंद्रावर दोघांची भेट झाली. अमोल यांनी राम नाईक यांचे आशीर्वाद घेतले. Amol Kirtikar is emotional while voting.

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar
Maharashtra Lok Sabha Election 2024 Voting LIVE : देशात 5 वाजेपर्यंत 54.68 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रत सर्वात कमी मतदान

वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे सेनेकडून अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात (Amol Kirtikar Vs Ravindra Waikar) शिंदे गटाकडून रवींद्र वायकर आहेत. दोन्ही शिवसैनिकांमध्येच हा सामना होत आहे.

गद्दार की निष्ठावान या मुद्या निवडणुकीत महत्वाचा ठरत आहे. मधुकर सरपोतदार आणि गजानन कीर्तीकर यांनी शिवसेनेकडून प्रत्येकी दोन वेळा तर जनता पक्षाकडून राम जेठमलानी यांनी दोन वेळा येथून निवडणूक जिंकली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसने नऊ वेळा जिंकला आहे. अभिनेते सुनील दत्त पाच वेळा तर एकदा प्रिया दत्त यांनी विजय मिळवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com