Police officials reviewing data under Operation Muskaan as Maharashtra reports over 48,000 missing women and minor girls cases in 2025. Sarkarnama
मुंबई

Maharashtra Missing Girls : वर्षभरात महाराष्ट्रातील तब्बल 48 हजार मुली, महिला बेपत्ता; विधानसभेत गृहविभागाचा धक्कादायक खुलासा

Maharashtra missing minor girls: मंगळवारी विधानसभेत अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह विभागाने धक्कादायक माहिती दिली.

Jagdish Patil

Maharashtra Missing Girls : महाराष्ट्रात मागील वर्षभरात तब्बल 48 हजार 278 अल्पवयीन महिला व मुली बेपत्ता झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 13 हजार अल्पवयीन मुली आणि महिलांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती राज्य सरकारने काल (ता. 24) विधानसभेत दिली आहे.

त्यामुळे आता सरकारच्या आणि गृहविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर बेपत्ता होण्याचं प्रमाण मुंबई, नवी मुंबई, रायगड, छतपती संभाजीनगर, नागपूर या शहरांमध्ये जास्त आहे.

काल मंगळवारी विधानसभेत अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याबाबत मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरातून गृह विभागाने ही माहिती धक्कादायक माहिती दिली आहे. गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 2025 या वर्षात हरवलेल्या 48 हजार 278 महिलांपैकी 36 हजार 581 महिलांना शोधण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मात्र, अद्याप 11 हजार 697 महिला बेपत्ता आहेत. तर 12 हजार 113 अल्पवयीन मुली हरवल्या होत्या. त्यापैकी 10 हजार 295 मुंलीचा शोध लागला आहे. तर 1818 मुली अजूनही बेपत्ता आहेत. आताची आकडेवारी ही 2024 या वर्षात हरवलेल्या महिला आणि अल्पवयीन मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे.

2024 या वर्षात 45 हजार 662 महिला आणि अल्पवयीन मुली हरवल्या होत्या. त्यापैकी मुंबईतील 4 हजार 515 अल्पवयीन मुले-मुलींपैकी 4 हजार 455 मुलामुलींचा शोध लागला आहे. तर राज्यात 20 जानेवारीपासून ऑपरेशन मुस्कान सुरु करत हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यात येत असल्याचंही सरकारने सांगितलं आहे.

मात्र, अद्याप 13 हजार अल्पवयीन मुली आणि महिलांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची सरकारने दिलेली माहिती धक्कादायक असून या माहितीमुळे पालकांमध्ये आपल्या मुलांबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT