Marathi School News: धक्कादायक! 2 हजार मराठी शाळा अडचणीत, 620 शाळा बंद होणार, 25 हजार शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार?

Supriya Sule Tweet : सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्यानं मराठी शाळा बंद पडत असल्याची स्थिती सभागृहात कबूल केल्याचं नमूद केलं आहे.
Marathi medium schools issue
Marathi medium schools issueSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही राज्यातील मराठी शाळांचं अस्तित्वच सध्या धोक्यात असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून राज्यातील 255 मराठी शाळा बंद करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील मराठी शाळांच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात त्यांनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्यानं मराठी शाळा बंद पडत असल्याची स्थिती सभागृहात कबूल केल्याचं नमूद केलं आहे. राज्यातील तब्बल 255 शाळा मागील दोन वर्षांत बंद पडल्या आहेत.महाराष्ट्रातच मराठी भाषेच्या शाळांची ही स्थिती होणे अतिशय गंभीर आणि खेदजनक असल्याचं सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे शिक्षणाच्या परिघातून मराठी भाषा हळूहळू दूर होतेय असे चित्र दिसते. अभिजात भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरता येऊ शकतो. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन मराठीतून शिक्षण अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी काम करावे. मराठी भाषेची पताका फडकवत ठेवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं मतही सुळे यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

Marathi medium schools issue
Maharashtra New Scam: महाराष्ट्रात खळबळ उडवणारा घोटाळा,कोट्यवधींच्या बँक गॅरंटी बोगस? सहा शहरांमध्ये छापेमारी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने लेखी प्रश्नोत्तरात राज्यातील मराठी शाळांच्या सद्यस्थितीची माहिती दिली. सरकारकडे विचारणा करताना राज्यात कमी पटसंख्येमुळे 2 हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून त्यापैकी 620 शाळा बंद होणार असल्याने 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. कोकण विभागात 700, विदर्भात 800 हून अधिक, पश्चिम महाराष्ट्रात 700 हून अधिक, मराठवाड्यात 400, उत्तर महाराष्ट्रात 300 हून अधिक मराठी शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत.

डिसेंबर 2025 मध्ये 620 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून 70 गावांमध्ये ना शाळा, ना पाटी पेन्सिल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास निवेदन सादर केलं आहे. या सगळ्यावर कुठली कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यात आली आली आहे किंवा येणार आहे? नसल्यास कारणं काय त्याची माहिती देण्याबाबतची मागणी एका निवेदनाद्वारे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी,सत्यजित तांबे,विक्रम काळे, शिवाजीराव गर्जे,सतीश चव्हाण,इंद्रिय नायकवडी यांनी सरकारकडे केली होती.

Marathi medium schools issue
Vidarbha BJP Politics: रवींद्र चव्हाणांनी साधला गडकरी-फडणवीस बॅलेन्स: भेंडे, पोटे, फुकेंकडे विदर्भाची सूत्र; डेहनकरांना बंडखोरीनंतरही बक्षीस

याबाबत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तरादाखल हे अंशत: खरे असून शासन स्तरावरुन मराठी शाळा बंद करण्याबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. तसेच शासनाचं असं कोणतंही धोरण नसल्याचं म्हटलं आहे. पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्याने राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागांतील तब्बल 255 शाळा मागील दोन वर्षांत बंद झाल्याची माहिती भुसे यांनी दिली आहे.

याचवेळी त्यांनी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रवेश वाढण्यासाठी सरकारी पातळीवर विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचंही शिक्षणमंत्री भुसे यांनी सांगितलं आहे. यात शाळा प्रवेशोत्सव, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप,प्रधानमंत्री मोफत पोषणशक्ती निर्माण योजना, मोफत गणवेश वाटप यांसारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com