Mumbai News, 26 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 1 जून आहे.
त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून आपापला उमेदवार निश्चित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विधान परिषदेच्या जागावाटपावरुन महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असून जागावाटपा संदर्भात महायुतीच्या नेत्यांच्या बैठका सुरू आहेत.
या सर्व घडामोडी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेने ठाणे विधान परिषदेत धक्कातंत्राचा अवलंब करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
शिवाय मतांची गोळाबेरीज करण्यासाठी बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीनीकरण करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. त्यामुळे रवींद्र फाटक यांना डावलून त्यांच्या जागी बविआचे क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे आता राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, रवींद्र फाटक यांनी याआधीच महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यामुळे आता ठाण्यातील विधान परिषदेची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यातील सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.