Maharashtra Government News: शिक्षकांनो सावधान! ‘हे’ कार्ड नसेल तर मेडिकल बिल अडकणार

ABHA Card for Tracher In Maharashtra: सरकारच्या या निर्णयामुळे आता शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा आरोग्यविषयक डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय दाव्यांची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल, असा सरकारचा दावा आहे.
ABHA Card for Tracher In  Maharashtra
ABHA Card for Tracher In MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

ABHA Card for Teachers: राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद आणि १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा ‘ABHA कार्ड’ काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे कार्ड नसल्यास वैद्यकीय खर्चाच्या परताव्याची बिले मंजूर केली जाणार नाहीत, असे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक काढले आहे. शिक्षण उपसंचालक डॉ. एकनाथ आंबोकर यांनी हा आदेश काढला असून, सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने आभा कार्ड तयार करून घ्यावे, असे सांगितले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे आता शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा आरोग्यविषयक डेटा डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वैद्यकीय दाव्यांची प्रक्रिया अधिक जलद आणि पारदर्शक होईल, असा सरकारचा दावा आहे. विशेष म्हणजे, पाच लाख रुपयांपर्यंतच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती दाव्यांसाठी हे कार्ड आवश्यक असणार आहे.

ABHA Card for Tracher In  Maharashtra
SSC Board Exam Big Change: दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका 2 तास आधी ऑनलाइन मिळणार

हा नियम सध्या केवळ जिल्हा परिषद आणि पूर्ण अनुदानित खासगी शाळांतील कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. विनाअनुदानित खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांना मात्र अद्याप यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान, शिक्षक संघटनांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असले तरी काही संघटनांनी सरकारकडे अंमलबजावणीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली आहे. ग्रामीण भागातील अनेक कर्मचाऱ्यांना ABHA कार्ड तयार करताना अडचणी येऊ शकतात, त्यामुळे सहाय्य केंद्र सुरू करण्याची मागणीही होत आहे.

ABHA Card for Tracher In  Maharashtra
Anganwadi Workers News: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा! 45 वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती

आभा कार्ड तयार करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे. कर्मचारी abha.gov.in या वेबसाइटवर किंवा मोबाइल अॅपच्या मदतीने काही मिनिटांत हे कार्ड तयार करू शकतात. सरकारने ३० जून २०२६ पर्यंत सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आभा कार्ड तयार करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

• ABHA कार्ड आता बंधनकारक
• मेडिकल बिलासाठी नवा नियम
• कार्ड नसल्यास दावा अडकणार
• ३० जूनपर्यंत कार्ड काढण्याचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com