Ajit Pawar, Nana Patole sarkarnama
मुंबई

Nana Patole Vs Ajit Pawar: तांबेंच्या विजयानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली ; पटोलेंनी अजितदादांना सुनावले..

Maharashtra MLC Election : नाना पटोले यांनी अजित पवारांना सुनावलं..

सरकारनामा ब्युरो

Nashik Graduate Election News : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (satyajeet tambe) विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९ हजारांनी पराभव झाला आहे.

तांबेच्या विजयानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं चित्र आहे.

सत्यजीत तांबे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती, असे विधान केले आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवारांना सुनावलं आहे.

“मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

“शरद पवार यांनी सत्यजीत तांबे यांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसच्या बड्या नेत्याला फोन केला होता. सत्यजीत तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली पाहिजे होती.” असं अजित पवार म्हणाले होते.

"सत्यजीत तांबे याचं घराणं काँग्रेसच्या विचारधारेशी निगडित असल्यामुळे मधल्या दीड महिन्यात काय झालं हे त्यानं जास्त मनाला लावून घेऊ नये," असे अजित पवार म्हणाले.

अजितदादांच्या विधानाचा दाखला देत नाना पटोले म्हणाले, "अजित पवार यांच्यासारखे जबाबदारी व्यक्ती असं बोलत आहे. सत्यजिंत तांबे या निवडणुकीत राष्ट्रवादीने मदत केली होती. असं जर अजित पवार यांचं म्हणणं असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तेवढी मदत केली असतील तर आज त्या जिंकल्या असत्या”

नाशिक पदवीधरमध्ये विजय मिळविल्यानंतर सत्यजीत तांबेंना काँग्रेस पक्षात परत घेणार का? याबाबत नाना पटोलेंनी मोठं विधान केलं आहे. “कॉंग्रेसकडे यासंदर्भात प्रस्ताव येत नाही तोपर्यंत यावर निर्णय होणार नाही” असं वक्तव्य देखील नाना पटोले म्हणाले. पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील, असे पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT