Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray News: मुख्यमंत्री टेंम्पररी, पण...; राज ठाकरेंचा टोला कुणाला?

Raj Thackeray Talk With IAS Officers: "ज्याला दहावीत ४२ टक्के पडलेत, तो आज 'आयएएस' अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात"

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: 'यूपीएससी'ची परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पार पडला. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं. "ज्याला दहावीत ४२ टक्के पडलेत, तो आज 'आयएएस' अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय, यालाच लोकशाही म्हणतात", अशी मिश्किल टिप्पणी राज यांनी केली.

याचवेळी राज यांनी भावी अधिकाऱ्यांना एक किस्सा सांगत मुख्यमंत्री टेंम्पररी असतात असं सांगितलं. मात्र, राज ठाकरे थेटपणे जरी बोलले नसले तरी त्यांचा रोख नेमकं कुणाकडे होता, याची आता चर्चा रंगली आहे.

भावी अधिकाऱ्यांना ठाकरेंनी मंत्रालयामधील एक किस्सा सांगितला . "एकदा मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर काही अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. यावेळी तेथे पत्रकारही होते. त्या अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं की, असूद्या, मी पर्मनंट आहे, ते टेंम्पररी आहेत. तुम्ही तुमची ताकद ओळखा ", असा म्हणत त्यांनी भावी अधिकाऱ्यांना सल्लाही दिला.

राज यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदींचाही समाचार घेतला. भावी अधिकाऱ्यांना मोलाचा सल्ला सांगत "तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला महाराष्ट्राचा आदर असला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या राज्याबद्दल (गुजरात) प्रेम असू शकतं तर तुम्हालाही तुमच्या राज्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, मोदींना वाटतं प्रत्येक गोष्ट गुजरातमध्ये गेली पाहिजे, तसं तुम्हालाही वाटलं पाहिजे", असं ठाकरे म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT