Maharashtra NCP Crisis Sarkarnama
मुंबई

Rohit Pawar Tweet: वळसे-पाटील साहेब, अजून काय पाहिजे ? ; रोहित पवारांचा सवाल ; साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास..

Rohit Pawar On Dilip Walse Patil: पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : माजी गृहमंत्री,शरद पवार यांचे विश्वासू, आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारच्या सत्तेत सहभागी झाल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोडून दिलीप वळसे पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत जातील, असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, दोन जुलै रोजी झालेल्या राजकीय भूकंपामध्ये दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना धक्का देत अजित पवारांना पाठिंबा दिला.

दिलीप वळसे पाटील हे साहेबांना सोडून दादांकडे गेल्यानं राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी वळसे-पाटलांचा राजकीय आलेख उलगडत शरद पवारांनी त्यांना काय दिलं, याचा लेखाजोखा टि्वटमध्ये मांडत निशाणा साधला आहे.

"वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली. आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून अपेक्षित नव्हती," असे रोहित पवार म्हणाले.

"प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या #सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?," असा सवाल रोहित पवारांनी वळसेंना केला आहे. आता वळसे-पाटील यावर काय बोलणार, याकडे लक्ष आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT