Sharad Pawar, Sunil Tatkare  Sarkarnama
मुंबई

NCP Crisis : शिवाजी महाराजांच्या एकाही मावळ्याने फितुरी केली नाही… पण आपण…?

Rohit Pawar slams Sunil Tatkare : पवार साहेबांनी आमदार, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदे आपल्या घरात दिली.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू, निकटवर्तीय अनेक नेते हे पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी मोठे नेते अजित पवार गटात गेले.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. पवार साहेबांनी आमदार, खासदारकी, मंत्री अशी सर्वच पदे आपल्या घरात दिली. अध्यक्षपदाची जबाबदारीही आपल्यावर सोपवली होती, पण ज्यांनी हे पद सांभाळलं त्यानेच इतरांच्या दावणीला हा पक्ष बांधावा का ? असा प्रश्न आपल्याला कसा पडला नाही? आमच्यासारख्या कार्यकर्त्याने तुमच्याकडून काय आदर्श घ्यायचा ? असा सवाल रोहित पवारांनी तटकरे यांना विचारला आहे.

"पक्ष संघटनेत आणि सत्तेतील असं एकही पद नाही जे तुम्हाला मिळालं नाही. तरीही अजून काय द्यायला पाहिजे होतं ? छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असलेल्या रायगड जिल्ह्याचं आपण प्रतिनिधीत्त्व करत आहात.. महाराजांच्या एकाही मावळ्याने कधी फितुरी केली नाही… पण आपण…..? असे टि्वट रोहित पवारांनी केलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरही गुरुवारी टीका केली होती. "भुजबळ साहेब आयु्ष्यभर जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलं… हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान?" असा सवाल रोहित पवार यांनी टि्वट करीत उपस्थित केला आहे.

"भुजबळ साहेब, पवार साहेबांनी नेहमी तुमची काळजी घेतली. एक लढाऊ शिलेदार म्हणून साहेबांचे तुम्ही पाठीराखे होतात. संकटाला न घाबरता तुम्ही जेलमध्ये गेलात, पण अचानक तुम्हाला असे काय झाले की तुमची भाषा १९० अंशात बदलली. साहेबांची साथ तुम्ही सोडली. स्वार्थांच्या आड येणारे सगळे आपल्याला बडवे वाटू लागले," असा टोला रोहित पवारांनी भुजबळांना लगावला.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT