Uddhav Thackeray Group Active: बंड केलेल्या आमदारांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची मोर्चेबांधणी ; युवासेनेचे सदस्य..

Assembly Elections: युवासेनेतील कोअर कमिटी सदस्यांचा दौरा संपल्यानंतर आदित्य ठाकरे देखील दौरा करणार आहेत.
Thackeray Vs Shinde
Thackeray Vs ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची युवासेना कामाला लागली आहे. युवासेना कोअर कमिटीचे सदस्य राज्यातील 40 विधानसभा मतदार संघाचा दौरा करणार आहे. ज्या मतदार संघातून आमदारांनी बंड केले त्या मतदार संघात जाऊन युवासेनेचे सदस्य आढावा घेणार आहेत.

युवासेनेतील सदस्यांकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या महिनाअखेर मतदारसंघाचा आढावा दौरा पूर्ण करुन आढावा देण्याच्या सूचना या सदस्यांना देण्यात आल्या आहेत.

Thackeray Vs Shinde
NCP Crisis : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नगर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल !

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक जिल्ह्यातून युवासेनेतील पदाधिकारी देखील ठाकरेंना सोडून गेले आहेत, या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या कोअर कमिटीतील सदस्य या मतदार संघाचा देखील आढावा घेणार आहेत. युवासेनेतील कोअर कमिटी सदस्यांचा दौरा संपल्यानंतर आदित्य ठाकरे देखील दौरा करणार आहेत.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम केअर फंडावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. "पीएम केअर फंड सरकारी नाही असे म्हणतात, त्यांची चौकशी होऊ शकत नाही, नेमका हा फंड आहे कुणाचा? पीएम म्हणजे प्रभाकर मोरे फंड आहे का हा? मग सांग वसाड्या पैसा गेला तरी कुठे?, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Thackeray Vs Shinde
Rohit Pawar slams Chhagan Bhujbal : हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान ? ; रोहित पवारांचा भुजबळांना सवाल

युवासेनेतील कोअर कमिटी सदस्यांना दिलेले जिल्हे आणि मतदार संघ

  • सिद्देश धाऊसकर - संभाजीनगर जिल्हा आणि जिल्ह्यातील मतदार

  • रुपेश कदम - अमरावती, अकोला

  • अंकित प्रभू - धुळे, नाशिक

  • धनश्री कोलगे - भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ

  • राजूल पाटील - मुंबई

  • शीतल शेठ - नवी मुंबई, ठाणे, पालघर

  • साईनाथ दुर्गे - नांदेड, धाराशिव

  • पवन जाधव - कोल्हापूर, पाटण

  • सुप्रद्धा फातर्फेकर - कोकण, रत्नागिरी

  • विक्रांत जाधव - रायगड

  • प्रवीण पाटकर - सिंधुदुर्ग

  • हर्षल काकडे - नागपूर, भंडारा, चंद्रपूर

  • निलेश महाले - जळगाव

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com