मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील (Shiv Sena) 39 आमदारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात वादळ उठले आहे. विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला त्याच रात्रीपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आता आणखी एका चर्चेनं राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. (CM Uddhav Thackeray Latest News)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या एका व्यक्तीने पुन्हा युती करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केल्याची चर्चा आहे. सर्व बंडखोर आमदार सूरतमध्ये असताना फडणवीसांना हा फोन करण्यात आला होता. मुख्यमंत्री ठाकरे राजीनामा देतील, असं फडणवीसांना सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
पुन्हा भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर विचार होऊ शकतो, असं फडणवीसांना विचारण्यात आलं होतं. मात्र युतीचा निर्णय आता केंद्रीय नेतृत्वच घेऊ शकते, असे फडणवीस यांनी कळवल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.
दरम्यान, शिवसेनेने या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. या निव्वळ भूलथापा असल्याचा खुलासा सेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे. जे बोलायचं ते उद्धव ठाकरे खुलेआम बोलतात. त्यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये, असं आवाहन प्रधान यांनी केलं आहे.
मागील काही दिवसांपर्यंत उद्धव ठाकरे यांनीच आघाडीतून बाहेर पडण्यासाठी बंड घडवून आणल्याची चर्चाही होती. जवळपास चाळीस आमदार शिंदे यांच्यासोबत जाणे शक्य नाही. ठाकरे यांनीच त्यांना पाठवल्याची चर्चा होती. पण खुद्द मुख्यमंत्र्यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.