दोन-तीन दिवसांत भाजपचं सरकार येणार! भाजप खासदाराचा मोठा दावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार आहेत.
Bjp Mp Pratap Patil Chikhlikar Latest Marathi News
Bjp Mp Pratap Patil Chikhlikar Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 बंडखोर आमदारांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. अपात्रतेच्या नोटिशीवर आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांना न्यायालयाने 12 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा आहे. पण भाजप खासदारांनी पुढील दोन ते तीन दिवसांतच भाजपचं सरकार येणार असल्याचा मोठा दावा केला आहे. (BJP MP Pratap Patil Chikhalikar News)

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. पंढरपूमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन करण्यासाठी गेले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आषाढीची महापूजा कुणाच्या हस्ते होणार हे विचारले असता त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पूजा करतील, असं उत्तर दिलं.

Bjp Mp Pratap Patil Chikhlikar Latest Marathi News
बंडखोर आमदारांमध्ये दोन गट; सोळा आमदार ठाकरेंच्या संपर्कात!

महाराष्ट्रात दोन ते तीन दविसांत भाजपचे (BJP) सरकार येईल, असा दावा चिखलीकर यांनी केला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात शिवसेनेतील 10 ते 12 खासदार असल्याचेही चिखलीकर यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दावर बंड केले आहे. 55 पैकी 40 च्यावर आमदार त्यांच्यासोबत आहे. मतदारसंघामध्ये विकास व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. केंद्रामध्ये भाजपचे सरकार आहे. राज्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपचे सरकार आले तर विकासाची कामे होतील. या भावनेतून किमान 10 ते 12 खासदार शिंदे यांच्यासोबत निश्चित जातील, असं वाटतं. प्रत्येक खासदाराला वाटत आहे, आपल्या मतदारसंघात विकास व्हावा. त्यासाठी ते शिंदे यांच्या संपर्कात आहेत, असं चिखलीकर यांनी स्पष्ट केलं.

Bjp Mp Pratap Patil Chikhlikar Latest Marathi News
पूजा चव्हाणची हत्या कशी झाली? राठोडांची 56 मिनिटांची सीडी असल्याचा नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने बंडखोरी केल्यानंतर यंदाची आषाढी पूजा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री म्हणून करतील, असे होर्डिंग्ज राज्यात अनेक ठिकाणी लागले आहेत. तसेच सोशल मीडियातही त्याबाबत अनेक संदेश फिरत आहेत. यंदा 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरात रंगणार आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला समर्थन दिल्यानंतर आघाडी सरकार अल्पमतात येईल आणि आषाढी एकादशीपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर राहणार नाहीत. त्यामुळे फडणवीस हे मुख्यमंत्री बनतील, असा दावा भाजप कार्यकर्ते व नेत्यांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com