Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Maharashtra Political Crisis sarkarnama
मुंबई

शिवसेनेत 'रिस्क' घेतलेल्यांना फडणवीस देणार मोठे 'बक्षिस' ; मंत्रीपदे कुणाला ?

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीने उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यास भाग पाडले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर (maharashtra political crisis) भाजपने (bjp) सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. देवेंद्र फडणीस सरकारमध्ये मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार, या विषयी चर्चा रंगल्या आहेत. (Devendra Fadnavis news)

राज्यात शिवसेना (shivsena) आमदारांच्या बंडखोरीने सुरू झालेले राजकीय नाट्य काल (बुधवारी) रात्री संपुष्टात आले. तब्बल साडेतीन तास सुनावणी झाल्यानंतर आज (30 जून) रोजी बहुमत चाचणी होईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.(Eknath Shinde News in Marathi)

न्यायालयाने फ्लोअर टेस्ट घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपल्याच लोकांकडून मिळालेल्या व्यथा मांडल्या आणि मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीने उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यास भाग पाडले. हे पक्षाच्या 56 वर्षांच्या इतिहासातील चौथे पण सर्वात मोठे बंड आहे. यापूर्वीच्या तिन्ही बंडखोरी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर झाल्या होत्या. शिंदेच्या या बंडात मोठी 'रिस्क' घेणाऱ्यांपैकी कुणाला मंत्रीपदे मिळणार, त्यांच्या नावांची सध्या चर्चा सुरु आहे.

महामंडळाची जबाबदारी

देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेना बंडखोर आमदारांना अधिक न्याय दिला जाणार आहे. 'मोठी रिस्क; मोठे बक्षिस' या धोरणानुसार शिवसेनेचे सध्या असलेले मंत्री अपग्रेड होतील. शिवसेनेत जे आमदार तीन ते चार वेळा निवडून आलेले आहेत, त्यांना पण संधी मिळण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस सरकार आणि उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही, त्यांनाही यावेळी संधी दिली जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद मिळणार नसेल त्यांना महामंडळाची जबाबदारी दिली जाणार आहे.

दोघांना डच्चू

आज (गुरुवारी) साडेअकरा वाजता गोव्यातील हॉटेल ताजमध्ये शिंदे गटाची बैठक होत आहे. या बैठकीत कुणाकुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे, कुणाची काही इच्छा आहे, यावर चर्चा केली जाणार आहे. मागच्या भाजप सरकार मधील प्रत्येक विभागातील दोघांना यावेळी डच्चू दिला जाणार आहे.

नव्या चेहऱ्यांना संधी

नव्या चेहऱ्यांना भाजपकडून संधी दिली जाणार आहे. 2014 ते 2019 या काळातला मंत्री म्हणून परफॉर्मन्स कसा होता, त्यावेळी केलेली कार्य याचाही सखोल विचार यावेळी मंत्रिमंडळामध्ये भाजप आमदाराचा समावेश करताना केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT