मुंबई : दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेली महाराष्ट्रातील राजकीय (maharashtra political crisis) उलथापालथ आता संपुष्टात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपच्या आमदाराला धमकीचे फोन आल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपल्याला धमकीचे फोन आले असल्याची तक्रारी मुंबईच्या गुन्हे शाखेकडे केली आहे. सतत दोन दिवसापासून फोन येत असल्याने लाड यांनी गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये माझा जिवाला धोका असल्याची भिती प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.
या चौकशीसाठी सीडीआर काढण्यास माझी हरकत नाही, असे लाड यांनी पत्रात म्हटलं आहे. या धमकी प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी लाड यांनी केली आहे.
काल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजता फडणवीस यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस एक-दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात.बुधवारी रात्री 11.15 च्या सुमारास उद्धव ठाकरे स्वत: राजीनाम्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. त्यांच्यासोबत कारमधून आदित्य आणि तेजस ठाकरे आणि शिवसैनिक देखील होते. राज्यपालांकडे राजीनामा सोपवून उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांचा ताफा मातोश्रीकडे रवाना झाला आहे.
जेव्हा उद्धव राज्यपालांकडे राजीनामा देण्यासाठी पोहोचले तेव्हा राज्यपालांनी त्यांना पुढील मुख्यमंत्री होईपर्यंत त्यांच्या पदावर राहण्यास सांगितले. राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य यांच्यासह मंदिरात पूजा केली. यानंतर ते मातोश्री या निवासस्थानी पोहोचले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.