Speaker of the Maharashtra Legislative Assembly Sarkarnama
मुंबई

Kalidas Kolambakar: भाजपच्या ज्येष्ठ आमदारावर फडणवीसांनी सोपवली तीन दिवसासाठी मोठी जबाबदारी

Speaker of the Maharashtra Legislative Assembly: विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना (कालिदास कोळंबकर) शपथ दिली जाईल.

Mangesh Mahale

Mumbai News: उद्यापासून (7 डिसेंबर) तीन दिवसीय विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून कर्मचाऱ्यांना याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. आज राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना शपथ देणार असल्याची माहिती आहे.

मला हंगामी अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत सकाळी फोन आला होता. त्यानुसार मी आज दुपारी एक वाजता शपथ घेणार आहे. 288 आमदारांमध्ये मी सर्वात सिनिअर आहे, त्यामुळे पक्षाने तीन चार दिवसांसाठी जबाबदारी दिली आहे.

उद्यापासून सुरु होणाऱ्या या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्ष निवड होईल.

विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. आज या हंगामी अध्यक्षांना (कालिदास कोळंबकर) शपथ दिली जाईल. 7, 8 आणि 9 डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशन दरम्यान हे हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नायगाव विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत.

महायुतीच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचीही तारीख ठरवण्यात आली आहे. १६ डिसेंबरपासून अधिवेशन घेण्यात येणार असून एक आठवड्याचे कामकाज सध्या निश्चित करण्यात आले आहे. विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी १० डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होणार आहेत. १६पासून अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याचे त्याची तयारी केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT