Minister Shambhuraj Desai reacting to Sanjay Raut’s remarks on Anand Dighe’s photo beside Balasaheb Thackeray, intensifying the Shiv Sena political row. Sarkarnama
मुंबई

Shivsena controversy : आनंद दिघेंबाबतचं 'ते' वक्तव्य शिंदेंच्या शिलेदाराच्या जिव्हारी; म्हणाले, 'राऊत सर्वात मोठे गद्दार, युतीतून निवडून येऊनही ठाकरेंना...'

Anand Dighe photo controversy : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघेंचा फोटो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावण्यावर आक्षेप घेतला आहे. शिवाय आनंद दिघे हे केवळ जिल्हाप्रमुख होते ते नेते किंवा उपनेते नव्हते असंही राऊतांनी म्हटलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 20 Sep : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आनंद दिघेंचा फोटो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावण्यावर आक्षेप घेतला आहे. शिवाय आनंद दिघे हे केवळ जिल्हाप्रमुख होते ते नेते किंवा उपनेते नव्हते असंही राऊतांनी म्हटलं आहे.

त्यांच्या याच वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. अशातच आता मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील राऊतांवर सडकून टीका केली आहे. जेव्हा ठाण्यामध्ये भगवा फडकला तेव्हा आनंद दिघेंच्या कामाचे बाळासाहेब ठाकरेंनी कौतुक केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का? असा सवाल देसाईंनी उपस्थित केला. राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले, ठाण्यामध्ये भगवा फडकला तेव्हा आनंद दिघेंच्या कामाचे बाळासाहेब ठाकरेंनी कौतुक केलं होतं.

बाळासाहेब ठाकरे जे बोलले ते संजय राऊत यांना मान्य नाही का? संजय राऊत एवढे मोठे लागून गेले का? असा सवाल करत राऊतांचं वक्तव्य चुकीचा असून राऊतच सर्वात मोठे गद्दार आहेत. कारण भाजप महायुतीमधून निवडून येऊनही त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना प्रवृत्त केलं होतं. त्यामुळे तेच सर्वात पहिले आणि मोठे गद्दार असल्याची टीका देसाई यांनी केली.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पेपरमध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावला होता. यावरून राऊतांनी टीका केली होती. ते म्हणाले, 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला जिल्हाप्रमुख असलेल्या आनंद दिघेंचा फोटो लावून तुम्ही काय साध्य करताय? अशा पद्धतीने ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्याचा हा राष्ट्रीय कट आहे. मी हे आनंद दिघेंचा आदर ठेऊन बोलतोय.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT