MNS leader Raju Patil criticizes Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Raju Patil News: ठाकरे बंधुंच्या युतीवर 'कामाचे बोला' म्हणणाऱ्या शिंदेंना मनसे नेत्यानं 13 प्रश्नांची यादीच पाठवली!

MNS Leader Raju Patil Questions Eknath Shinde: नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे," असं म्हणत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना १३ कामांच्या बाबत प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचे उत्तर शिंदे देतील का?

सरकारनामा ब्यूरो

राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर प्रश्न विचारल्यावर चिडलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी डिवचलं आहे. दोन ठाकरेंच्या युतीवरील प्रश्नावर 'कामाचे बोला'असे म्हणणाऱ्या शिंदेंना राजू पाटलांनी 13 प्रश्न विचारले असून उत्तर देण्याचं आवाहन केले आहे. या प्रश्नांची यादीच त्यांनी सोशल मीडियावर टाकली आहे.

विशेषत: कल्याण-डोंबिवली भागातील विकासावरुन एकनाथ शिंदे आणि राजू पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असतात. राजू पाटीलांनी यापूर्वीही या भागातील विकासकामावरुन व्हिडोओ शेअर करीत एकनाथ शिंदेंना रखडलेले प्रकल्पाची आठवण करुन दिली आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागावून 'कामाचे बोला' असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी प्रश्न उपस्थित करुन शिंदेंना डिवचलं आहे.

"जे कामाचे नाहीत, ते श्री प्रभू रामाचे पण नाहीत……! परवा आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मनसे-शिवसेना (उबाठा) युतीबाबत विचारलेल्या एका प्रश्नासंदर्भात संबंधित पत्रकाराला चिडून बोलले की कामाचे बोला! चला तर मी पण काही कामाचे प्रश्न त्यांना विचारतोच. किमान नगरविकास मंत्री व आमचे पालकमंत्री म्हणून तरी उत्तर अपेक्षित आहे," असं म्हणत राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना १३ कामांच्या बाबत प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचे उत्तर शिंदे देतील का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

राजू पाटलांनी एकनाथ शिंदेंना विचारलेले हे प्रश्न

  • बिल्डरांच्या फायद्यासाठी सुरू केलेल्या कल्याण-तळोजा मेट्रोचे भूसंपादन कधी होईल ? आणि जर ते झाले नसेल तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी सुरू केलेले मेट्रोचे हे काम,ज्यामुळे वाहतुक कोंडीत अधिकच भर पडत आहे ते काम कधी स्थगित करणार ?

  • पलावा जंक्शनवरील अनधिकृत बांधकामांच्या जागामालकांना मोबदला देऊन ती बांधकामं तोडून पलावा चौक मोकळा करून दुसऱ्या पुलाचे काम कधी सुरू करणार ?

  • कल्याण-डोंबिवलीकरांच्या हक्काचा नवी मुंबईला दिलेला १४० एलएलडी पाणी कोटा आम्हाला कधी वर्ग करणार ?

  • अनधिकृत पणे सुरू केलेला दिवा डंपिंग कधी बंद करणार ?

  • नवी मुंबईत नव्याने घेतलेल्या १४ गावांच्या विकासासाठी आवश्यक ५९०० कोटी रूपयांचा पॅकेज कधी देणार ?

  • कल्याण-डोंबिवलीतल्या २७ गावांचा प्रश्न कधी मार्गी लावणार ?

  • मानपाडा रोड व कल्याण-शीळ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे कधी हटविणार ?

  • कल्याण-शीळ रस्ते बाधित शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळेल व तिसरी लाईन कधी होईल ?

  • २७ गावांसाठी असलेली अमृत योजना कधी पुर्ण करणार ?

  • पलावा पुल कधी होईल ?

  • लोकग्राम पुल कधी होईल ?

  • दिवा रेल्वे ROB कधी होईल ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT