Jayant Patil, uddhav Thackeray, Supriya Sule Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेसाठी पवारांच्या नावाला ठाकरेंचा विरोध? जयंत पाटील अन् सुप्रिया सुळे मातोश्रीवरून माघारी फिरताच आदित्य ठाकरेंनी केलेलं ट्विट चर्चेत

Aditya Thackeray On Maharashtra Rajya Sabha Election 2026 : 'शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत असा पक्षातील कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि विधानसभेतील सदस्यांचा आग्रह आहे. त्यामुळे पवारांसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आम्ही उद्धव ठाकरेंना केली.'

Jagdish Patil

Mumbai News, 04 Mar : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यापैकी 6 जागा महायुतीच्या तर एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे. मात्र, या एका जागेसाठी उमेदवार कोण द्यायचा याबाबतचा तोडगा अद्याप तोडगा अद्याप मविआला काढता आलेला नाही.

एकीकडे या जागेसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील या जागेवर दावा सांगितला आहे. तसंच ही जागा काँग्रेससाठी सोडावी अशी भूमिका देखील काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे राज्यसभेवर नेमका कोणत्या पक्षाचा उमेदवार दिला जाणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. अशातच मंगळवारी (ता.03) शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेते प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

या भेटीत शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी शिवसेनेने सकारात्मक विचार करावा, पाठिंबा द्यावा अशी मागणी या नेत्यांनी ठाकरेंकडे केली. या भेटीनंतर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशा चर्चा सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा मविआचा उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं समोर आलं आहे.

कारण जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे मातोश्रीवरून माघारी परतल्यानंतर आदित्य ठाकरेंनी एक पोस्ट केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील उद्धव ठाकरे यांना मातोश्री येथे भेटले. या भेटी दरम्यान राज्यसभेच्या जागेबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल.

राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते चर्चे करता एकत्र येतील.' आदित्य यांच्या पोस्टमुळे ठाकरेंची शिवसेना शरद पवारांना पाठिंबा देण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवाय पाटील आणि सुळे यांनी भेट घेतल्यानंतरही ठाकरे चर्चा करण्यावर भर देत आहेत. या चर्चेत ते काँग्रेसला सहभागी करणार असल्याचे संकेत देखील ठाकरेंनी ट्विटमधून दिले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर जयंत पाटील म्हणाले, "शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जावेत असा पक्षातील कार्यकर्त्यांचा, लोकसभा आणि विधानसभेतील सदस्यांचा आग्रह आहे. त्यामुळे पवारांसाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी आम्ही उद्धव ठाकरेंना केली. याबाबत एक दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असं ठाकरेंनी सांगितलं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT