Nashik BJP : स्वीकृतसाठी जागा फक्त 6, पण भाजपमधील इच्छुकांची संख्या ऐकुण तुम्हालाही येईल चक्कर

Nashik NMC BJP accepted corporator : नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. भाजपच्या हिमगौरी आहेर महापौर आहेत. स्थायी समिती सभापती देखील भाजपचाच आहे. आता स्विकृतनगरसेवक पदासाठी सहा जागा भाजपला मिळणार आहेत.
Nashik BJP
Nashik BJPSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महापालिकेत महापौर, उपमहापौर पदानंतर स्थायी समिती सभापती पदाची निवड देखील पार पडली आहे. त्यामुळे आता आता भाजपासह सर्वच पक्षांना स्वीकृत सदस्यपदाचे वेध लागले असून स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी पाचशे जणांनी दावेदारी केली असून पक्ष कार्यालयातील रजिस्टर नावांनी भरल्याची माहिती मिळत आहे. पक्षातील पराभूत उमेदवारांसह, पक्षातील पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थामध्ये कार्यरत पदाधिकारी देखील या रेसमध्ये उतरले आहेत.

महापालिकेत एकूण दहा स्विकृत सदस्यांची निवड होणार आहे. त्यात भाजपच्या वाटेला सहा जागा येणार आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे इच्छुकांकडून लॉबिंग सुरु आहे. जागा सहा आणि इच्छुकांची संख्या ५०० अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पक्षश्रेष्ठींचा मोठा कस लागणार आहे.

Nashik BJP
Nashik Crime : नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद', पोलिसांनीच गुन्हेगाराला सावध करुन फरार केलं ; भाजप शहराध्यक्षांचा गंभीर आरोप

स्विकृत नगरसेवक म्हणून विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व जाणकार व्यक्तींना संधी मिळणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात पक्षातील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा पराभूत नाराजांनाच संधी दिली जात असते. स्विकृत नगरसेवकपदाच्या निकषात सामाजिक संस्थामधील कामाचा अनुभव हा देखील एक निकष असतो. त्यामुळे अगदी गणेश मंडळे तसेच सामाजिक संस्थांमधील कामांचा अनुभव दाखवत काहींनी कागदपत्रे सादर केली आहेत. तीन वर्षाचे ऑडीट आणि अन्य आवश्यक ती कागदपत्रे पूर्ण करुन इच्छुकांनी दावेदारी कन्फर्म कशी होईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (Nashik NMC)

महापालिका निवडणुकीवेळी देखील भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी होती. सुमारे एक हजार अर्ज आले होते. त्यातील केवळ ११८ जणांना उमेदवारी देण्यात आली होती. एबी फॉर्मवरुन मोठा गोंधळ उडाला होता. अनेक नाराज इच्छुकांनी अन्य पक्षात जाऊन उमेदवारी केली तर काहींना मात्र निवडणुकीत बंडखोरी किंवा विरोधात काम करू नये यासाठी स्विकृत नगरसेवकपदाचे लॉलीपॉप दाखवण्यात आले होते. त्यामुळे आता त्या सगळ्यांनी स्विकृतसाठी हट्ट धरल्याचे समजते.

Nashik BJP
Nashik Kumbh Mela : नाशिक महापालिकेचे 3 हजार कोटींचे अंदाजपत्रक ; कुंभमेळ्यासाठी मात्र फक्त 1 कोटी रुपयांची तरतूद

दरम्यान याच महिन्यात स्वीकृत नगरसेवकांची निवड केली जाण्याची शक्यता असली तरी देखील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने संघर्ष टाळण्यासाठी व तोडगा काढण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींना वेळ लागू शकतो. परिणामी निवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com