Pratap Sarnaik and ST Department (1).jpg Sarkarnama
मुंबई

Pratap Sarnaik: अजितदादांच्या खात्यावर प्रताप सरनाईकांचा रोष; थेट पत्रकार परिषद घेऊनच केली अधिकाऱ्यांची पोलखोल

Pratap Sarnaik’s Allegations on Ajit Pawar’s Finance Department : महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीतर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम सरकारकडून आमच्या खात्याला लवकरत मिळत नाही, असे सरनाईक म्हणाले.

Mangesh Mahale

Mumbai News: एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सरनाईक यांनी परिवहन खात्याला वेळेत निधी मिळत नसल्याची तक्रार करीत अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत रोष व्यक्त करीत महायुतीला घरचा आहेर दिला आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना एसटीतर्फे देण्यात येणाऱ्या सवलतीची रक्कम सरकारकडून आमच्या खात्याला लवकरत मिळत नाही, असे सरनाईक म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. यावरून एसटी महामंडळावर टीका करण्यात येत आहे. मात्र, अर्थखात्याने निधी दिला नसल्याचे एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. परिवहन खात्याकडे पाठवलेली फाईल अर्थखात्याने परत पाठवली. आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय, असे देखील सरनाईक म्हणाले.

एसटी डेपोतील पेट्रोलपंप आम्ही चांगल्या कंपनींना देणार आहोत. त्यासाठी रिलायन्स, इंडियन ऑईल या कंपन्यांचा प्रस्ताव आले आहेत, असे सरनाईक यांनी सांगितले.

सरनाईक यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर आज त्यांनी आपला पदभार स्वीकारला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात ते बोलत होते. स्वीकारला. स्वारगेट प्रकरण घडल्यानंतर आम्ही आता सावध झालो असून अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेऊ, असे सरनाईक म्हणाले.

कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा. अर्थ खात्याकडे आम्ही भीक मागत नाही, आमचा हक्क मागत आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांच्या अर्थखात्याला सुनावले. येत्या 5 वर्षात 25 हजार बसेस घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. किती एसी बस आणि किती नॉन एसी बस लागतात याचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाले सरनाईक...

  • कुठल्याही परिस्थीत प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल.

  • पगारासाठी आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा अधिकार मागतो.

  • जर पगार वेळेवर पोहोचत नसेल तर शोकांतिका आहे.

  • नव्या बसेस मध्ये पॅनिक बटण आणि CCTV असेल

SCROLL FOR NEXT