Pune 10 April : विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उघड उघड आपली नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यानच्या काळामध्ये भुजबळ यांनी याबाबत अधिकच बोलणं टाळलं असल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज महात्मा फुले वाड्याच्या रखडलेला कामाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी आपण फक्त आमदार असल्यास म्हणत अप्रत्यक्षपणे खंत व्यक्त केली.
महात्मा फुले वाड्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी छगन भुजबळ पुण्यामध्ये आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, जेव्हा पासून महात्मा फुलेवाडा वाडा देशाला अर्पण करण्यात आला आहे. तेव्हा पासून आणि त्यापूर्वी पासून अनेक लोक याठिकाणी येतात. याठिकाणी सभा घेण्यासाठी जागा नाही. अनेक वर्षे जागा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. हे 100 ते 200 कोटींचे काम आहे. यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करून देखील प्रयत्नांना यश येताना पाहायला मिळत नाही.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील सकारात्मक आहेत. मात्र पालिकच्या अधिकाऱ्यांशी लोकांशी संवाद साधून जागा मोकळी करून घेणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी ज्या पद्धतीने जमीन अधिग्रहण केले जाते त्या पद्धतीने या जागेचे अधिग्रहण केले जात नाही. जागा ताब्यात घेण्याचा या ठिकाणचा वेग शून्य आहे. जमीन अधिग्रहणाबाबत पालिका अधिकारी नुसते टोलवा टोळली करत आहे. यामध्ये प्रगती न झल्यास आंदोलन करण्याची वेळ येईल, असा देखील इशारा छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.
सरकारमध्ये असताना देखील फुलेवाड्याच्या कामासाठी आंदोलनात का करावं लागतं असं विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, या गोष्टी सरकारला विचारायला हवं या ठिकाणी जे मंत्री, पालकमंत्री यांना विचारायला हवा की या गोष्टीसाठी आंदोलन का ? करावा लागत आहे. मी फक्त सरकार मधील घटक पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे मी उपोषण करायला मोकळा आहे. बाकीच्या जबाबदारी असल्या तर थोडीशी अडचण होते असं खोचक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.
महात्मा फुले यांच्यावर आधारित हिंदी चित्रपट येत आहे. यावर काहींनी आक्षेप घेतला आहे. महात्मा फुले यांच्याबाबत मराठीमध्ये चित्रपट आले असले तरी पहिला हा हिंदी चित्रपट आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी माझी भेट घेतली त्यावेळेस अनेक पुस्तकाचा विचार करून चित्रपट बनवला आहे, कोणतीही लिबर्टी चित्रपट बनवताना घेतली नाही. एखाद्या गोष्टीबाबत आक्षेप असेल तर आम्ही पुरावे देऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं आहे.
चित्रपटाला सेसॉर ने देखील परवानगी दिली आहे. हे खरं आहे की त्या काळातील कर्मठब्राह्मणाने काही गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे इतिहास हा इतिहास म्हणून समोर आला पाहिजे. महात्मा फुले यांच्या वर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा देतो आहे. याचा मला आनंद आहे. त्यामुळे मला वाटतं कोणीही विरोध करू नये, असं देखील छगन भुजबळ म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.