Anil Parab on ST workers issue Sarkarnama
मुंबई

Anil Parab : ST कर्मचाऱ्यांची ढाल झालेल्या पडळकर, खोत अन् सदावर्तेंवर ठाकरेंच्या शिलेदाराने तलवार चालवली

Maharashtra ST workers issue : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय एसटी सध्या खड्ड्यात गेली असून याला भष्ट्र अधिकारी कारणीभूत असल्याचंही त्यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Jul : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय एसटी सध्या खड्ड्यात गेली असून याला भष्ट्र अधिकारी कारणीभूत असल्याचंही त्यांनी सभागृहात बोलताना सांगितलं.

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी खड्ड्यात अडकली आहे. तिला बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही वारंवार कळवतोय की एसटी महामंडळात भ्रष्टाचार सुरू आहे. सध्याचा संचित तोटा जवळपास 10 हजार 962 कोटी रुपयांचा आहे. या तुटीतून एसटीला बाहेर काढायचं असेली तर कडक धोरण स्वीकारावं लागेल, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, यावेळी अनिल परब यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यासह वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सडकून टीका केली. विरोधी सरकार असताना आंदोलन करणारे हे तिघे ता कुठे गायब झालेत.

आता यांच्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर येण्याची हिंमत आहे का? एसटी कर्मचाऱ्यांना हे सरकारी कर्मचारी करणार होते, डंके की चोट पर करणार असं म्हणत होते ते आता डोळे वटारले की ताटाखालची मांजर होऊन गप्प बसतात, अशा शब्दात टीका केली. सभागृहात बोलताना अनिल परब म्हणाले, राजकारणाच्या माध्यमांतून एसटी कामगारांना भडकावून 5 महिन्याचा संप घडवून आणला.

एसटी 5 महिने बंद ठेवण्याचं काम या सभागृहात एक आणि दुसरे खाली आहेत यांचे नेते सदावर्ते यांनी केलं. कुठे गेले खोत, पडळकर? आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलं दुख यांना होत नाही. विरोधी सरकार असताना त्यांना वाटत होतं की एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत घेतलंच पाहिजे.

आता त्यांचा आवाज का येत नाही, कर्मचाऱ्यांना डंके के चोटपे सरकारी सेवेत घेणार असं म्हणणारे सदावर्ते, खोत आता गेले कुठे? आता डोळे वटारले की ताटा खालचे मांजर झालेत. आता त्यांच्यात हिंमत नाही की कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायची. खोत आणि पडळकर आझाद मैदानावर पंधरा दिवस झोपले.

आता त्यांचं प्रेम कुठे गेले? असा सवाल करत या तिघांनी एसटी मारली, कर्मचाऱ्यांचा बळी घेतला आणि तुमच्यामुळेच एसटी कर्मचारी कर्जबाजारी झाले. कारण त्यांना पाच महिन्यांचा पगार मिळाला नाही. मात्र, दुसरीकडे यांची राजकीय पोळी भाजल्यामुळे आता ते यावर बोलायला तयार नाहीत, अशा शब्दात अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पडळकर, खोत आणि सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT