Aditya Thackeray statement : दिशा सालियान प्रकरणात दिलासा...आदित्य ठाकरेंची 4 वाक्यांची प्रतिक्रिया अन् थेट मूळ विषयाला हात

Disha Salian case News : दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने जारी केले आहे. या याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली. याच मुद्यावरून आदित्य ठाकरे यांनी चार वाक्यांची प्रतिक्रिया दिली.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचे प्रतिज्ञापत्र एसआयटीने जारी केले आहे. या प्रकरणातील आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. याच मुद्यावरून आदित्य ठाकरे यांनी यावर केवळ चार वाक्यांची प्रतिक्रिया दिली अन् थेट मूळ विषयाला हात घालत राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

गेली पाच वर्ष झाले ठराविक लोक बदनामीचा प्रयत्न करीत होते. मी त्याच्यावर कधीच काही बोललो नाही आणि आजही काहीच बोलणार नाही. ज्याविषयाशी माझा दूर-दूरचाही संबंध नाही. ज्या विषयाची मला काहीच माहिती नाही, त्यावर बोलून काहीच उपयोग नसल्याचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे (Shivsena ) नेते आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

Aditya Thackeray
Shivsena UBT: पहिल्याच पत्रकार परिषदेत नवे जिल्हाप्रमुख इंगवलेंचा थेट पालकमंत्र्यांवर वार, जुगार, मटकेवाले मुख्यमंत्र्यांना..?

ससून डॉगच्या परिसरात आपले अनेक कोळी बांधव मत्स्य विक्रीचा व्यवसायिक पॅकेजिंग करतात फ्रिजिंग करतात. त्यांनी एमबीटीकडून निरीक्षण नोटीस आली आहे. हा वाद केंद्र व राज्य सरकारमध्ये आहे. पण या वादामुळे आपले कोळी बांधव आणि अनेक नागरिक मराठी असतील, अमराठी असतील जे येथून व्यवसाय करतात. त्यांना या ठिकाणहून हटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंदोलन सुरु असून सर्वजण रस्त्यावर उतरले आहेत. राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करून ज्या कोळीबांधवाना काढण्याचे प्रयत्न होतोयत त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आज विधानसभेत केली असल्याचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Aditya Thackeray
Fadnavis BJP strategy : फडणवीसांचे आमदार-मंत्र्यांना 7 कानमंत्र : 'स्थानिकच्या' निवडणुकीसाठी ठरली भाजपची सिक्रेट स्ट्रॅटेजी

पुण्यातील एका डिलिव्हरी बॉयने घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केला. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. हा प्रकार दुर्देवी आहै. राज्यात एकंदरीत काय चाललेय. राज्यात काय चाललेय त्याचेच एक उदाहरण आहे. अशाप्रकारचे गुन्हे नोंदवले जातात की नाही याची नोंद नाही, असेही आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी स्पष्ट केले.

Aditya Thackeray
Mahamandal appointments Maharashtra: महायुतीमधील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजप, शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच !

धारावीमध्ये पहिल्या यादीतच 80 टक्क्याहून अधिक नागरिक अपात्र केली आहेत. भाजपकडून अथवा काही ठराविक लोकांकडून प्रचार सुरु झाला आहे की, हे बांगलादेशी आहेत घुसखोर आहेत. पण हे सगळे लोक काटेवाडी होते. वर्षनुवर्ष ते या ठिकाणी राहतात. गेल्या दीडशे वर्षांपासून अधिककाळ ते या ठिकाणी राहत आहेत. पिढ्या ना पिढ्या या ठिकाणी राहत असलेल्या या मुंबईकर नागरिकांना पहिल्या यादीत अदानी यांनी अपात्र केले. आता अपात्र लोकांना म्हणजेच 2011 नंतरच्या लोकांना अदानीकडूनच घरे विकत घ्यावी लागणार आहेत. 2000 ते 2011 मधील नागरिकांना डम्पिंग ग्राउंडवर (कचरा कुंडीवर) बसवण्याचा प्रयत्न आहे. पत्रकार परिषद घेऊन पाठीमागेच सांगितले होते की आता या कचऱ्याचा कर लादण्यात येणार आहे.

Aditya Thackeray
Uddhav-Raj Thackery: तब्बल 20 वर्षानंतर ठाकरेंच्या वाघांची एकाच व्यासपीठावरुन होणार गर्जना! 2005 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

माझी माहिती आहे की, एकनाथ शिंदे दोन कंपन्यांना टेंडर देण्यात होते. एक हैदराबादची कंपनी तर दुसरी चेन्नईची कम्पनी होती त्या पैकी एका कंपनीला ते टेंडर देणार होते. मात्र, सरकार बदलले त्यानंतर आता अदानी यांच्या कंपनीलाच टेंडर देण्यात आले आहे. एकीकडे धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली लाखो लोकांना तुम्ही बेघर करणार आहात तर मुंबईतल्या लाखो रुपयांच्या मोक्याच्या जागा तुम्ही बळकावणार तर तिसऱ्या बाजूला मुंबईकरावर अदानी कर म्हणजेच कचऱ्याचा कर लावणार आहेत. कचऱ्याचा कर लावण्याऐवजी त्यांनी ती जागा स्वतःच्या पैशाने स्वच्छ करायला हवी, मात्र तसे ना करता ही जागा स्वच्छ करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पैसा खर्च करण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी उघड केले.

Aditya Thackeray
Raj Thackrey Politics: नाशिकमध्ये मनेसेने केली शिवसेनेची परतफेड, राज आणि उद्धव ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा नवा अध्याय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com