Harshwardhan Sapkal | Maharashtra municipal elections 2025 Sarkarnama
मुंबई

Harshwardhan Sapkal News: महापालिका निवडणुकीत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर; प्रदेशाध्यक्ष सपकाळांची घोषणा

Congress Municipal Corporation Politics: कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. याबैठकीत पक्ष संघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला.

सरकारनामा ब्यूरो

राहुल क्षीरसागर

Thane News : युती व आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोडी कराव्या लागतात. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आले नाही. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी ठाण्यात दिली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत दिल्याची चर्चा आहे.

कोकण विभागातील महानगरपालिका क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडली. याबैठकीत पक्षसंघटनेचा विस्तार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका याविषयी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधण्यात आला.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित झाल्यानंतर आघाडीचा अंतिम निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाईल. कोकणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगले वातावरण होते.

परंतु युती आघाडीचा धर्म पाळल्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले. दरम्यान, आता पक्ष विस्तार कसा करता येईल, कार्यकर्ता असतानाही आम्ही न लढल्यास त्याची किंमत पक्षाला मोजावी लागले, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली.

स्थानिक पातळीवर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका असेल त्या ठिकाणांच्या पदाधिकाऱ्यांनी युती, आघाडी घेण्याचा निर्णय घेण्यासंदर्भातील अधिकार दिले असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मित्रपक्षांबरोबर वाटाघाटी करुन त्या त्या दृष्टीने युती आघाडीचा निर्णय घ्यावा असेही सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ( Congress) कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले असल्याचा आरोप केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही, असे म्हणणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पाहावे.

फडणवीस यांच्याच पोलिसांनी याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे, त्यामुळे मतचोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT