SEBI On Hindenberg: 'सेबी'चा 'हिंडेनबर्ग'ला दणका, अदानी समूहाला मोठा दिलासा; स्टॉक मॅनिप्युलेशनचे सर्व आरोप फेटाळले

SEBI Rejects Hindenburg allegations : अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चकडून जानेवारी 2023 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यात अदानी समूहावर शेल कंपन्यांच्या थरांद्वारे ऑडिट अनियमितता, स्टॉक फेरफार आणि संबंधित पक्ष व्यवहार लपवल्याचा आरोप करण्यात आला होता
 Sebi on adani.jpg
Sebi on adani.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात खळबळ उडाली होती. अदानी उद्योगसमूहावर या अहवालात गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर अदानींच्या जवळपास सर्वच कंपन्यांचे शेअर गडगडले होते. विरोधकांनीही यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. पण आता याप्रकरणी सेबीनं (SEBI) मोठा निकाल दिला आहे.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या जानेवारी 2023 मध्ये प्रसिध्द केलेल्या अहवालात भारतातील प्रसिध्द उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर स्टॉक मॅनेपरेशनचा आरोप केला होता. मात्र, आता सेबीनं हिंडेनबर्ग रिसर्चचे सगळे आरोप फेटाळले असून अदानी समूहाला क्लीन चीट दिली आहे.

सेबीने अदानी समूहाला गुरुवारी (ता.18 सप्टेंबर 2025) क्लीन चिट दिली आहे. सेबीच्या अंतिम निकालात हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाविरुद्धचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. सेबीनं अदानी समूहाकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही. तसेच मार्केट मॅनिप्युलेशनचे किंवा इनसाइडर ट्रेडिंगचे पुरावेही सापडले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

सेबीनं दिलेला हा निकाल उद्योगपती गौतम अदानी(Gautam Adani) , त्यांचे बंधू राजेश अदानी, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर,अ‍ॅडिकोर्प एंटरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. सेबीनं या कंपन्यांविरुद्ध कोणतेही पुरावे सापडले नसल्याचं निकालात नमूद केलेलं आहे.

 Sebi on adani.jpg
Pune Crime : आयुष कोमकर खून प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; आंदेकर फॅमिलीतील आणखी एकाला पोलिसांनी उचललं; कोर्टात खळबळजनक दावे

अमेरिकन शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्गने गौतम अदानींविरुद्ध गंभीर आरोप करताना अ‍ॅडिकोर्प एंटरप्रायझेस, माइलस्टोन ट्रेडलिंक्स आणि रेहवर इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांचा वापर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा केला होता. यामुळे अदानींना संबंधित पक्ष व्यवहार नियमांना बगल देण्यात आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यास मदत झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.

याबाबत पीटीआय न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार,सेबीनं अदानी समूहाविरुद्धच्या सर्व कार्यवाही रद्द केल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सेबीनं कर्ज व्याजासह परतफेड करण्यात आले, कोणतेही निधी काढले गेले नाहीत आणि म्हणूनच, कोणताही फसवणूक किंवा अनुचित व्यवहार झाला नसल्याचंही सेबीनं म्हटलं आहे.

 Sebi on adani.jpg
Maval Politic's : मावळात महायुती नाहीच : सुनील शेळकेंविरोधात बाळा भेगडेंनी दंड थोपटले; बापू भेगडे, काकडेंचीही साथ

हिंडेनबर्गने जानेवारी 2023 मध्ये आरोप केला होता की, अदानी ग्रुपने अ‍ॅडिकोर्प एंटरप्रायझेस, माइलस्टोन ट्रेडलिंक्स आणि रेहवर इन्फ्रास्ट्रक्चर या तीन कंपन्यांचा वापर अदानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यासाठी केला. त्यांनी असा दावा केला होता की यामुळे अदानींना संबंधित पक्ष व्यवहार नियमांना बगल देण्यात आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यास मदत झाली.

अदानी ग्रुपने हिंडेनबर्गचे आरोप सातत्याने नाकारले आहेत. या आरोपांनंतर, सेबीने हिंडेनबर्ग आणि अदानी ग्रुप दोघांविरुद्ध चौकशी सुरू केली. जून 2024 मध्ये, सेबीने हिंडेनबर्गला नोटीस बजावली, ज्यामध्ये त्याचा संशोधन अहवाल आणि शॉर्ट-सेलिंग क्रियाकलापांशी संबंधित नियमांचे संभाव्य उल्लंघन समाविष्ट होते. यामध्ये कंपनीच्या संशोधन अहवालाचा आणि शॉर्ट-सेलिंग क्रियाकलापांशी संबंधित नियमांचे संभाव्य उल्लंघनांचा उल्लेख समाविष्ट होता.

 Sebi on adani.jpg
Shiv Sena Politics : शिंदेंची शिवसेना ठाकरेंचा उरलासुरला पक्षही फोडणार; कोल्हापुरात लवकरच मोठा धमाका...

अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चकडून जानेवारी 2023 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. ज्यात अदानी समूहावर शेल कंपन्यांच्या थरांद्वारे ऑडिट अनियमितता, स्टॉक फेरफार आणि संबंधित पक्ष व्यवहार लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. या अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली, ज्यामुळे त्यांचे बाजार मूल्य त्याच्या शिखरावर असताना १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घसरले होते.

सर्वोच्च न्यायालयानं सेबीला चौकशी करण्याचं निर्देश दिले. बाजार नियामकानं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे की, हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी समूहाविरुद्धचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत आणि म्हणूनच सर्व आरोप फेटाळण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com