congress mla Sarkarnama
मुंबई

MLC Election 2024: काँग्रेसचे 'फितूर' आमदार कोण? क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांचा अहवाल हायकमांडच्या दरबारी

मृणालिनी नानिवडेकर.

Vidhan Parishad Election 2024: महाविकास आघाडीकडे एकूण ७२ मते असताना पहिल्या पसंतीत महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना केवळ ५५ मते मिळाली असल्याने एकूण १७ मते फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसते. निवडणुकीत काँग्रेस (Congress)आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली आहेत.याबाबतचा अहवाल महाराष्ट्र काँग्रेसने दिल्लीला पाठवला आहे. पक्षविरोधी कृती केल्याबद्दल कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.

झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर, शिरीष चौधरी, हिरामण खोसकर आणि मोहन हिंबर्डे या आमदारांच्या नावांची चर्चा सर्वाधिक आहे. मात्र, ते आमदार कोण हे काँग्रेसकडून कारवाई करण्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

महायुतीकडे १९८ मते असताना त्यांच्या ९ उमेदवारांनी २१४ मते घेतल्याने सत्ताधाऱ्यांनी किती आणि कशी मते ओढली, याची गणिते उलघडणे सुरु झाले आहे. काँग्रेसची मते तर फुटलीच पण बहुजन विकास आघाडी ,समाजवादी पक्ष ,एमआयएम यांची मते गेली तरी कुठे असाही प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे एक मत अवैध ठरले तरी महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळाला असा दावा सत्ताधारी नेते करीत असून लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेली ही बेरिज कुतुहलाचा विषय आहे.

महायुतीची मते 199

भाजपा : १०३ शिवसेना : ३७ राष्ट्रवादी : ४० प्रहार जनशक्ती : 2, मनसे : १ स्वाभिमानी पक्ष रवी राणा : 1, राष्ट्रीय समाज पक्ष रत्नाकर गुट्टे १ जनसुराज्य विनय कोरे १ आणि अपक्ष १३ .

महाविकास आघाडीची मते 72

काँग्रेस : ३७ उबाठा :१५ + क्रांतीकरी शेतकरी पक्ष शंकरराव गडाख , शरद पवार गट : १२ समाजवादी : २ , एमआयएम:२ माकपा :१ , शेकाप : १. शेकापचे शामसुंदर शिंदे हे रायगडच्या पक्षासमवेत नव्हते तरी त्यांचेही मत मिळाले नाही. बहुजन विकास आघाडीची ३ मतेही विरोधी पक्षांकडे न जाता महायुतीकडे वळली असे दिसते आहे.

महायुतीने पहिल्या पसंतीची २१४ मते घेत आश्चर्याचा धक्का दिला आहे. शिंदे गटाकडे ३७ मते असताना त्यांच्या दोन्ही उमेदवारांनी ४९ मते घेतली.शिंदे यांना असलेल्या अपक्षांच्या पाठिंब्यापेक्षा ही मते जास्त आहेत. भाजपच्या पंकजा मुंडे २६, योगेश टिळेकर २६, परिणय फुके २६, अमित गोरखे २६ अशी चौघांनी १०४ मते मिळवली तर सदाभाऊ खोतांनी पहिल्या फेरीत १४ मते घेतली म्हणजेच भाजपला ११८ सदस्यांचा पाठिंबा मिळाला , राजेश विटेकर २३ आणि शिवाजीराव गर्जे यांनी २४ मते घेत अजितदादा गटाकडील ४० मतांपेक्षा ७ मते जास्त घेतली आहेत.

आघाडीला पहिल्या पसंतीची मते

प्रज्ञा सातव : २५ मिलिंद नार्वेकर २२ आणि जयंत पाटील ८ अशी केवळ ५५ मते मिळाली.कॉंग्रेसने या निकालानंतर आता कारणे दाखवा नोटिस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.दोन वर्षांपूर्वी क्रॉस वोटींग झाले त्या वेळची समिती चौकशी करुन गेली पण कारवाई कुणावरच झाली नाही .

उबाठाची दोन मते फुटली

कॉंग्रेसची मते फुटल्याची चर्चा सुरु असतानाच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची २ मते फुटल्याचा दावा केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT