eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: ही महाराष्ट्र धर्माची लढाई, मराठी माणसा जागा रहा, सावध रहा!

Maharashtra dharma battle call to Marathi people: मोदी-शहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली व हे सर्व उघडय़ा डोळय़ांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीस-मिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल.

Mangesh Mahale

Mumbai News: विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता काही तास शिल्लक आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरु आहे. आज प्रचार संपला, उद्या मतदान होईल. ही महाराष्ट्र धर्माची लढाई आहे. मराठी माणसा जागा रहा. सावध रहा!, असा सल्ला ठाकरेसेनेचे दिला आहे.

निवडणुकीच्या प्रचारात धर्मयुद्ध, व्होट जिहाद आदी मुद्दे गाजले. यावरुन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून मतदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. लोकशाही मार्गाने मत देणाऱ्यांना लक्ष्य करून धर्मयुद्धाची भाषा करणारे देवेंद्र फडणवीस यांनी खरे तर महाराष्ट्र धर्माशीच द्रोह केला.

मोदी-शहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली व हे सर्व उघडय़ा डोळय़ांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीस-मिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

पैशांनी निवडणुका लढवल्या...

गुंडगिरी, लुटमार, कोयता गँगचा हैदोस, महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचाराने उन्मळून पडतो व त्याच भ्रष्टाचाराच्या पैशांनी निवडणुका लढवल्या जातात. महाराष्ट्र राज्याची पत आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे सरकार मोदी–शहा चालवत आहेत. महाराष्ट्राला हे सर्व उलथवून टाकावे लागेल, असे ठाकरेसेनेने म्हटलं आहे.

बेरोजगारांच्या फौजा

मोदी–शहांनी महाराष्ट्र उघडपणे लुटला. अदानी या उद्योगपती मित्राच्या घशात मराठी माणसाची मुंबई घातली व हे सर्व उघडय़ा डोळय़ांनी पाहत मोदींचा जय करणारे फडणवीस–मिंधे यांना महाराष्ट्र धर्माचे शत्रूच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात बेरोजगारांच्या फौजा उभ्या राहत आहेत. शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. महाराष्ट्राची औद्योगिक आणि आर्थिक घसरण सुरू आहे.

‘एक है तो सेफ है’

‘एक है तो सेफ है’ हा त्यांचा नवा नारा म्हणजे स्वतःचा डरपोकपणा सिद्ध करणारा आहे. मणिपुरात जाऊन तेथील हिंसाचार थांबविण्याची धमक आणि कुवत देशाच्या पंतप्रधान, गृहमंत्र्यांत नाही व महाराष्ट्रात येऊन ते हिरोगिरी करतात. महाराष्ट्र सुरक्षित आहेच हो, तुमच्या येण्याने अस्थिर आणि असुरक्षित होत आहे.

काय म्हटलं आहे अग्रलेखात

  • सगळाच पैशांचा खेळ. त्यामुळे आपल्या लोकशाहीचा साफ खेळखंडोबा झाल्याचे दिसत आहे.

  • मोदी, शहा, उत्तर प्रदेशसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आपापली राज्ये वाऱ्यावर सोडून महाराष्ट्रात पिचकाऱ्या उडवीत फिरत होते.

  • झाशीच्या इस्पितळात 12 नवजात अर्भकांचा जळून कोळसा झाला, पण त्यांचे मुख्यमंत्री मुंबईत ‘बटेंगे तो कटेंगे’चे नारे देत फिरत होते.

  • मणिपुरात हिंसाचार पुन्हा भडकला. चार महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करून ठार केले.

  • मणिपुरातील मंत्र्यांचे बंगले लोकांनी जाळले आणि पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात शिवसेना, राष्ट्रवादी काँगेसवर टीका करीत राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT