Election Campaign : CM शिंदे अन् गडकरींनी मोदी, शाहांनाही टाकलं मागं, घेतल्या तब्बल 'एवढ्या' सभा; ठाकरे, पवारांसह कुणाच्या किती सभा?

Maharashtra Political Prachar Sabha: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली,रोडशो आणि सभा झाल्या.यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या.
Assembly Election Prachar
Assembly Election Prachar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. तसेच 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी सुरु असलेला महाराष्ट्रातल्या प्रचारांच्या तोफा अखेर सोमवारी (ता.18) थंडावल्या आहेत. पण यंदाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.त्यामुळे महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपल्या पक्षप्रमुखांसह स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरवलं होत्या.

केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच भाजप नेत्यांना पाठीमागं टाकत थेट 72 सभा घेतल्याचं समोर आलं आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही पाठीमागं नसल्याचे समोर येत असून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तब्बल 74 प्रचारसभा घेत नवा रेकॉर्ड केला आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत प्रचारसभा, रॅली,यांनी वातावरण ढवळून काढलं होतं.तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी 53, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे 44, मनसे अध्यक्ष राज ठाकरे 49, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 64, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 57 सभांमधून झंझावाती प्रचार केला.

Assembly Election Prachar
Ajit Pawar : लेकानं केलं दमदार भाषण, अजितदादांनी घेतली फिरकी; म्हणाले,'रात्रभर...'

देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते असलेल्या नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत केवळ 10, केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 15,योगी आदित्यनाथ 11 सभा घेतल्या. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 8,काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 9,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 65 सभा,प्रियंका गांधी 3 सभा घेतल्या.

भाजप नेते नितीन गडकरी यांनी भाजपच्या सर्वच नेत्यांना पाठीमागे टाकत यंदा सभा व रॅलींचा विक्रम केला आहे. गडकरींनी 72 सभा घेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मतांची पेरणी केली. भाजपचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही 27 सभा घेत प्रचार केला.

Assembly Election Prachar
Solapur News : 'राम सातपुतेंचे स्टेट्‌स का ठेवले?'; आमदार समर्थकाला नातेपुत्यात मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात विधानसभा निवडणुकीदरम्यान, प्रचाराचा झंझावात केला आणि एकूण 64 ठिकाणी त्यांच्या रॅली,रोडशो आणि सभा झाल्या.यातील दिवाळीनंतर झालेल्या 50 वर सभा त्यांनी अवघ्या 13 दिवसांत केल्या. म्हणजे सरासरी 4 सभा त्यांनी दररोज घेतल्या. वर्धा जिल्ह्यात आर्वीत शेवटची सभा घेतली आणि प्रचाराची सांगता केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तब्बल 61 सभांना संबोधित करत सभांची एकसष्टी गाठली आहे.त्यांनी जयंत पाटील यांनी या सभांच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाडा,कोकण असे महाराष्ट्राचे पाचही विभाग पिंजून काढले आहे. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्र ३७, मराठवाड्यात 9, विदर्भात 2, उत्तर महाराष्ट्र 5, मुंबई - कोकण विभागात 8 सभांचा समावेश होता.

Assembly Election Prachar
NCP Politics : नाना पटोलेंना घेरण्यासाठी राष्ट्रवादीने लावली 'फिल्डिंग', पदाधिकारी साकोलीत मुक्कामी

दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी जवळपास 35 सभा घेतल्या आहेत.त्यात बीड जिल्ह्यातील सहा उमेदवारांसह मुंबई, ठाणे, पुणे, आळंदी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, नांदेड, लातूर, मुंब्रा कळवा, वांद्रे ,माजलगाव, गेवराई, यांसह अनेक ठिकाणी या 35 सभा घेतल्या आहेत.विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या परळी मतदारसंघात एकही मोठी प्रचारसभा घेतलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com