Sharad Pawar | Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

NCP Party Hearing Result : 'राष्ट्रवादी'बाबत निवडणूक आयोगाच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

Jui Jadhav

Mahavikas Aghadi News : राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. मात्र या निर्णयाविरोधात आता सगळे विरोधक एकवटले आहेत. शरद पवार यांच्या पाठीशी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खंबीरपणे साथ देऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याच सोबतच त्यांच्या पक्षातील नेत्यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार(Ajit pawar) यांना देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय केंद्र सरकारने लिहून दिलेला आहे, निवडणूक आयोगाने तो फक्त जाहीर केला. काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशात एकही प्रादेशिक पक्ष अस्तित्वात राहणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर केंद्रीय गुप्तचर संस्था आणि निवडणूक आयोगाने मोदी सरकारच्या आदेशाने प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात केली आहे.

अगोदर शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जे झाले ते लोकशाहीची हत्या करण्याचाच प्रकार आहे. मोदी सरकार आणि निवडणूक आयोग केवळ विरोधी पक्षच नाही तर या देशातील लोकशाही संपवत आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आजही या सगळ्यांचा बाप आमच्यासोबत -

शरद पवार(Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ह्या निकालावर परखड प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी या पक्षाला जन्म दिला ज्यांनी या पक्षाला देशा देशात पोहोचवला आज त्याच पक्षावर घाला घालण्यात आला. मात्र या सगळ्यांचा जो बाप आहे तो अजूनही आमच्या सोबत आहे आमचा चेहरा आजही शरद पवार आहे. अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

सत्तेचा गैरवापर करून हा निकाल दिला -

'केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मुंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे.' अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT