Supriya Sule News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो आहे. 'लाडकी बहीण योजनेतून पुन्हा सरकार येण्याची खात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. मात्र, या योजनेवरून सुप्रिया सुळेंनी सरकारला धारेवर धरले.
'भावांना बहिणीचं नातंच कळलं नाही. ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करत आहेत. प्रेमात व्यवसाय नसतो आणि व्यवसायात प्रेम नसतं. सरकारला व्यवसाय आणि प्रेमातलं अंतर कळतं नाही. 1500 रुपयांत नातं विकलं जाणार नाही.', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'लोकसभेपर्यंत बहीण आठवली नाही. लोकसभेच्या निकालानंतर बहीण आठवली.', असा टोला सुप्रिया सुळे यांनी सरकारला लगावला. मुंबईतीलषण्मुखानंद हाॅलमध्ये महाविकास आघाडीचा मेळावा होतो आहे. या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी सरकारचा समाचार घेतला.
'सरकारला व्यवसाय प्रेमातलं अंतर कळतं नाही. ते म्हणतात एक बहीण गेली तर दुसऱ्या बहिणी आणू. राज्यातील बहिणीचं नातं विकवू नाही. निरागस असणारं नातं त्याला किंमत लावायचे पाप या सरकारने केलं आहे. 1500 रुपयाला नातं विकात घेत नाही', असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
'राज्यातील दोन भाऊ बोलले. ऑक्टोबर पर्यंत 10 हजार रुपये देऊ पण मतं दिलं नाही तर ते परत घेण्याची ताकद आहे. दुसरा भाऊ म्हणतो आमचं लक्ष आहे की कुठली बहीण कुठे मतदान करत आहे. यांच्या कुठलही नातं हे मताशी आहे.
कुठल्याही बहिणीचे पैसे घेऊन बघा काय करायचे ते आम्ही बघू. त्यांनी त्यांच्या गलिच्छ राजकारणात बहिणीचं नातं देखील आणलं', असा टोला सुळे यांनी सरकारला लगावला.
महाविकास आघाडीच्या या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. 'मुख्यमंत्री चेहरा कोणाचा यावरून चर्चा सुरू आहे. मी आता सांगतोय. पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार इथे आहेत.त्यांनी मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा. मी त्याला आता जाहीर पाठिंबा देईन', असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.