Uddhav Thackeray : जागेवरून मारामाऱ्या, पाडापाडी! उध्दव ठाकरेंनी पवार, पटोलेंसमोर सांगितला पुढचा धोका

Mahavikas Aghadi Melava Assembly Election : युतीमधील अनुभव सांगताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीला जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदाबाबत सतर्क केले.
Mahavikas Agadhi Melava
Mahavikas Agadhi MelavaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि नाना पटोलेंसमोरच पुढचा धोका बोलून दाखवला. आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण, यावरून ठाकरेंनी पवार आणि काँग्रेसला थेट तुम्ही चेहरा ठरवण्याचे सुचवले. त्याला आपला पाठिंबा असेल, असेही ते म्हणाले. यामागे ठाकरेंना नेमकी कोणती भीती आहे, हेही त्यांनी बोलून दाखवले.

आघाडीच्या मेळाव्यात सुरूवातीलाच भाषण करताना ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. हात जोडून न्रम विनंती, असे बोलत ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्र आणि देशाला दिशा दाखवली आहे. ही दाखवलेली दिशा पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार, अशी चर्चा आहे.

Mahavikas Agadhi Melava
Narayan Rane : नारायण राणेंना हायकोर्टाची नोटीस; लोकसभा निवडणुकीतील विजयाचे काय होणार?

आज काँग्रेस आणि पवारांनी चेहरा जाहीर करावा, मी त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. फक्त जागेवरून मारामाऱ्या करू नका. एखादी जागा काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचे नाही, असे करायचे नाही. एखादी जागा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे गेली म्हणून इतर पक्षांनी काम करायचे नाही, असे करू नका. सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे ठाकरे स्पष्टच बोलले.

पुढचा धोका सांगताना ठाकरेंनी युतीतील अनुभव सांगितला. ते म्हणाले, जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतला, त्या अनुभवाची पुनर्रावृत्ती नको आहे. युतीत जागावाटप व्हायचे, अशाच बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे त्या बैठकांमध्ये जाहीर केले जायचे. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे पाडण्यात टाकायचो.

Mahavikas Agadhi Melava
Uddhav Thackeray Vs Dhananjay Chandrachud : उद्धव ठाकरेंनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनाच सुनावले...

तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होणार, मग तुझ्या जागा मी पाडणार. माझ्या जागा तो पाडणार. मग पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्व राहिले. त्यामुळे आधी ठरवा, मग पुढे चला. मला काहीच हरकत नाही. पण या धोरणाने जाऊ नका, असे स्पष्ट करत ठाकरेंनी आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याबाबत आघाडीतील नेत्यांना ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे आता आघाडी यावर काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com