Ashok Chavhan
Ashok Chavhan  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi Morcha : महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी : चर्चांना उधाण!

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi Morcha : महापुरूषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडी आणि घटक पक्षांकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला आज सकाळी १०.३० वाजल्यापासून सुरूवात होईल. हा विराट मोर्चा असेल,असे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. मोर्चात काँग्रेस पक्षानेही मोठी ताकद लावली आहे. मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे महत्त्वाचे प्रमुख नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan) या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्विट करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे आपण मोर्चात जरी सहभागी नसलो तरी आपली मोर्चाला संपूर्ण पाठिंबा आहे. परंतु माजी आमदार अमिता चव्हाण या मोर्चात सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

चव्हाण यांनी म्हणाले, महाविकास आघाडीच्या १७ डिसेंबर रोजी नियोजित मोर्चाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र एका निकटवर्तीय कुटुंबातील नांदेड येथे पूर्वनियोजित विवाह सोहळ्यामुळे मला मोर्चात सहभागी होणे शक्य नाही. माजी आमदार सौ. अमिता चव्हाण तिथे उपस्थित राहतील.कृपया वस्तुस्थितीची नोंद घ्यावी."

आता चव्हाण यांनी लग्नाचं कारण दिले असले तरी, त्यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चांना उधाण आले आहे. चव्हाणांनी मोर्च्याच्या दिवशी ऐनवेळी ही माहितीदिल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT