Mahavikas Aghadi News :  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi : पटोलेंचा दावा पावसामुळे, तर जयंत पाटील म्हणतात, ऊन्हामुळे वज्रमूठ सभा होणे अवघड; आघाडीत सावळागोंधळ!

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीत ऊन पावसामुळे सावळागोंधळ..

Chetan Zadpe

Vajramuth Sabha News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार याकडे राज्याचे लक्ष लागले असताना, यासर्व घडामोडींचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो, अशी चर्चाही सुरू झाली.

भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठीची वज्रमूठ आता सैल पडतेय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. महाविकास आघाडीच्या नियोजित सभा रद्द झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पवारांच्या निवृत्तीनंतर आता महाविकास आघाडीचं काय होणार? अशी चर्चांना उधाण येत आहे.

महाविकास आघाडीच्या पुढील नियोजित सभांवर ऊन- पावसांचं सावट निर्माण झाले आहे. उन पावसाच्या या अवकाळाचे सावट महाविकास आघाडीच्या सभांवर जमा होत आहे. एका नेत्याने उन्हामुळे सभेवर प्रश्नचिन्हं निर्माण केले आहे. तर महाविकास आघाडीतल्या दुसऱ्या नेत्याने पावसामुळे सभांवर साशंकता निर्माण केले आहे. त्यामुळे वज्रमूठ सभांवरून महाविकास आघाडीत सावळा गोंधळ सुरू झाले आहे.

तीन पक्ष, तीन नेते आणि तीन वक्तव्ये होत आहेत. पुण्यात होणारी वज्रमूठ सभा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आघाडीच्या नियोजित चार ही सभा रद्द झाल्याचे सांगण्यात चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "सद्या पाऊस होत आहे, त्यामुळे सभा होणार की नाही सांगता येणार नाही." तर याच्या अगदी उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, उन्हाळाच एवढा आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या पुढील सभा या पार पडणं अवघड जाईल, असे म्हणाले.

वज्रमूठच्या तीन सभा पार पडल्या. पुढील चार सभा नियोजित होत्या. १४ मे रोजी पुण्यात वज्रमूठ सभे नियोजित होती. या सभेची जबाबदारी विरोधीपक्ष नेते अजित पवारांवर होती. दुसरी सभा २८ मे रोजी कोल्हापुरात नियोजित होती. तर याची जबाबदीरी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर होती. तिसरी सभा नाशिक शहरात नियोजित होती. व याची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर होती. तर चौथी सभा ११ जून रोजी अमरावती येथे पार पडणार असे नियोजित आहे. याची जबाबदारी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर होती.

पण आता य़ाच सभावर सावट निर्माण झाले आहे. यासाठी शरद पवारांनी घेतलेला निर्णय किती जबाबदार आहे? हा संशोधनाचा वि्षय आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीच्या सभांवर होणार नाही, असे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT