Washim Bazar Samiti : बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार गवळी अन् आमदार पाटणींची धुळधाण; आघाडीला घवघवीत यश!

Washim Bazar Samiti News : वाशिम जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का, आघाडीने मिळवले मोठे यश
Bhavna Gawli, Rajendra Patni
Bhavna Gawli, Rajendra PatniSarkarnama
Published on
Updated on

Market Committee Election : सहकार क्षेत्रातील महत्वाच्या असलेल्या वाशिम जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, वाशीम, मानोरा महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत सिद्ध केले. माजी खासदार अनंतराव देशमुख यांचा करिष्मा रिसोडात चालला असून या बाजार समितीत भाजपला बहुमत मिळाले आहे. यामुळे जिल्ह्यात शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawli) आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांना मोठा धक्का बसला आहे.

मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली आहे. 18 संचालकापैकी विकास आघाडीचे 17 संचालक निवडून आले आहेत तर भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. यामुळे तालुक्यातील सहकार क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले आहे.

Bhavna Gawli, Rajendra Patni
Yavatmal District APMC Analysis : बाजार समितीच्या निकालाने महाविकास आघाडी चार्ज !

तालुक्यातील सहकार क्षेत्रावर आजपर्यंत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही आघाडीच्या ताब्यात होती. तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास तर्फे काँग्रेस राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी, बळीराजा मित्र मंडळ व डॉक्टर अरुण इंगोले मित्र मंडळ एक संघपणे या प्रचाराला लागले होते. तर काँग्रेसचे आमदार अमित झनक यांनी आपली ताकद पणाला लावली होती.

Bhavna Gawli, Rajendra Patni
Maregaon APMC Result : मारेगावात काॅंग्रेस-शिवसेनेने (ठाकरे) एकत्र येत केला भाजपचा पराभव !

कारंजा बाजार समितीवर स्व. माजी आमदार प्रकाश डहाके प्रणित शेतकरी विकास आघाडीचा झेंडा फडकला. संचालक पदाच्या 18 जागेवर एकतर्फी वर्चस्व प्रस्थापित करून डहाकेंनी सहकार क्षेत्राचे आपणच 'दादा' असल्याचे दाखवून दिले. तर खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या पाठोपाठ या निवडणूकीतही माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी, यांच्या पॅनलचा दारूण 'पराभव' झाला.

रिसोड येथील बाजार समितीच्या 18 जागांसाठी झालेल्या अत्यंत अटितटीच्या लढतीत भाजप (BJP) व मित्र पक्षाचा निसटता विजय झाला. 3 जागांसह भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाने विजयाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीने लागोपाठ 7 जागा काबीज केल्या. त्यामुळे भाजप आणि शिंदे गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या गटाने कृषी उत्पन्न बाजार समीतीवर एकतर्फी वर्चस्व गाजवले आहे. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशानंतर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच निवडणूक होती.

Bhavna Gawli, Rajendra Patni
Chandrapur APMC Analysis : चंद्रपूर जिल्ह्यात कॉंग्रेसची कामगिरी चांगली, पण कुठे-कुठे सभापतिपदासाठी रस्सीखेच !

यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी आमदार विजयराव जाधव, शिवसेना शिंदे गटाच्या खासदार भावनाताई गवळी होत्या. मात्र, यावेळी त्यांना आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने कडवी झुंज दिली. वाशिम जिल्ह्यात भाजपला केवळ रिसोडमध्ये यश मिळाले आहे. या ठिकाणी त्यांनी 10 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे.

मंगरूळपीर बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागांवर माजी मंत्री सुभाषराव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनल चा एकतर्फी दणदणीत विजय झाला. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदिपक विजय संपादन केल्यामुळे त्यांचे सक्षम नेतृत्व अधोरेखित झाले आहे. माजी मंत्री सुभाषराव ठाकरे व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलने निवडणूक लढविली यामध्ये १८ पैकी १७ जागा शेतकरी सहकार पॅनल ने पटकावल्या तर मंगरूळपीर तालुका विकास आघाडीचा पार धुव्वा उडाला.

Bhavna Gawli, Rajendra Patni
Bazar Samiti News : बाजार समितीत मंत्री भुसेंचा पराभव; ठाकरेंच्या खेळीने पुढील राजकारणासाठी धोक्याची घंटा?

मनोरा बाजार समितीमध्येही महाविकास पॅनलने एकहाती सत्ता काबीज करत १५ संचालक निवडणुकीत विजयी झाले, तर भाजपा समर्थक शेतकरी आघाडीला २ जागेवर तर एका अपक्ष उमेदवारांनी विजय संपादन केला.

जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित शेतकरी विकास आघाडीने घवघवीत यश मिळवून बाजार समितीवर झेंडा फडकविला. या निवडणुकीत काट्याच्या दुरंगी लढतीत शेतकरी सहकार पॅनलने सहा जागांवर विजय मिळवित आपले अस्तित्व सिध्द केले. प्रारंभी तिरंगी वाटणारी ही निवडणूक थेट दुरंगी झाली. शेतकरी विकास पॅनलमध्ये निवडून आलेले बहुसंख्य संचालक माजी संचालक होते. मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर शेतकरी विकासला ९ जागा तर शेतकरी सहकार पॅनलला ६ जागा मिळाल्या तर मार्केट बचाव पॅनलचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com