Mahavikas Aghadi Sarkarnama
मुंबई

Maharashtra Lok Sabha 2024: महाविकास आघाडीतील तिढा सुटला; असा ठरला फॉर्म्युला

Mangesh Mahale

Mumbai News: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील (mva candidates list) जागावाटपाचा तिढा आज सुटला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा (mva maharashtra candidates list) फॉर्म्युला ठरलेला आहे.

शिवसेना ठाकरे गट – 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट – 10 जागांवर लढणार असल्याचे राऊतांनी जाहीर केले. महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हेच प्रमुख तीन पक्ष या आघाडीत असण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना ठाकरे गट – 21

बुलडाणा - प्रा. नरेंद्र खेडेकर

यवतमाळ - वाशीम - संजय देशमुख

मावळ - संजोग वाघेरे - पाटील

सांगली - चंद्रहार पाटील

हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर

संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

धारशिव - ओमराजे निंबाळकर

शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे

नाशिक - राजाभाऊ वाजे

रायगड - अनंत गिते

सिंधुदुर्ग - रत्नागिरी - विनायक राऊत

ठाणे - राजन विचारे

मुंबई - ईशान्य - संजय दिना पाटील

मुंबई - दक्षिण - अरविंद सावंत

मुंबई - उत्तर पश्चिम - अमोल कीर्तिकर

परभणी - संजय जाधव

दक्षिण मध्य - अनिल देसाई

कल्याण - वैशाली दरेकर

हातकणंगले - सत्यजित पाटील

पालघर - भारती कामडी

जळगाव - करण पवार

काँग्रेस 17

नंदूरबार

धुळे

अकोला

अमरावती

नागपूर

भंडारा गोंदिया

गडचिरोली चिमूर

चंद्रपूर

नांदेड

जालना

मुंबई उत्तर मध्य

पुणे

लातूर

सोलापूर

कोल्हापूर

रामटेक

उत्तर मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – 10

बारामती

शिरूर

सातारा

दिंडोरी

माढा

रावेर

अहमदनगर

बीड

वर्धा

भिवंडी

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT