MVA Sarkarnama
मुंबई

MVA Seat Sharing: काँग्रेसचं मोठा भाऊ ? काँग्रेसला ८४ तर शरद पवार पक्ष, उद्धव ठाकरे पक्षाला इतक्या जागा मिळणार

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: जागा वाटपावरून महाविकास आघाडीत (MVA Seat Sharing) वाद सुरु असल्याचे चर्चा सुरू असताना आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येत २१५ जागा निश्चित केल्या आहेत. 'आमच्यात कोणी लहान-मोठा भाऊ नाही. महाराष्ट्र वाचवणे हा धर्म असून, त्यासाठी आम्ही एकत्र लढत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. उद्या (गुरुवारी) आघाडीची पत्रकार परिषद आहे.

२१५ जागांमध्ये काँग्रेसला ८४, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी ६५ जागा देण्यात आल्या आहेत. तर समाजावादी पार्टीच्या अबू आझमी यांना एक जागा देण्यात आल्याची माहिती आहे. ७३ जागांचे वाटपही येत्या लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

७३ जागामध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, असे चित्र आहे. विदर्भात काँग्रेससाठी, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी, तर मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेना आणि काँग्रेससाठी जास्त जागा देण्यात आल्या आहेत.कोकण आणि मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला इतर दोन पक्षांच्या तुलनेत जास्त जागा मिळणार असल्याचे जाणकार सांगतात.

शिवसेना ठाकरे गटानं महाविकास आघाडीत लोकसभेला सर्वाधिक जागा लढल्या होत्या. त्यानंतर जागा काँग्रेस, शरद पवार गटाला सुटल्या होत्या. पण लोकसभेतील कामगिरी पाहता विधानसभेला काँग्रेसला अधिक जागा मिळणार आहेत. काँग्रेस ११९ जागा लढवेल. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा भाऊ असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT