Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
मुंबई

महाविकास आघाडी एकवटली; १७ तारखेला शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात एल्गार

सरकारनामा ब्यूरो

Mahavikas Aghadi News : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्यावतीने येत्या १७ तारखेला मुंबईत (Mumbai) विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली. ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), खासदार संजय राऊत यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, ''महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये राज्यपाल भगसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सर्वांच्या विरोधात येत्या १७ तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक प्रश्न, या आंदोलनामध्ये उपस्थित करण्यात येणार आहेत'', असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

''सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलायला लागले आहेत. मात्र महाराष्ट्राचे सरकार त्यावर काहीही बोलत नाहीत. महाराष्ट्रात (Maharashtra) सध्या नेभळटं सरकार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलले तरी आम्ही मात्र हे खपवून घेणार नाहीत. त्यासाठी ही एकजूट आम्ही करत आहोत. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दर्शनासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. येत्या १७ तारखेला महाविकास आघाडीच्यावतीने (Mahavikas Aghadi) विराट मोर्चा काढणार आहोत. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात असणार आहे. एवढ्यात तर त्यांनी योग्य दखल घेतली नाही तर त्यानंतर महाराष्ट्र बंद करण्यात येईल'', असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT