Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा फायदा नेमका काय? ही आहेत खास वैशिष्ट्ये

Samruddhi Mahamarg : राज्याच्या विकासासाठी समद्धी महामार्ग महत्वाचा ठरणार
Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg Sarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Mahamarg : मुंबई आणि नागपूर या दोन मोठ्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या महामार्गाच्या कामाचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत पूर्ण झाला आहे. या महामार्गाची टेस्ट ड्राइव्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ डिसेंबरला केली. एवढंच नाही तर या महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याच्या विकासासाठी समद्धी महामार्ग महत्वाचा कसा ठरणार? समृद्धी महामार्ग नेमकं कसा आहे? या महामार्गाचा फायदा नेमकं काय होईल? समद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये नेमकं काय आहेत? याविषयीची सविस्तर माहिती पाहूयात...

मुंबई – नागपूर ''समृद्धी महामार्ग''हा प्रकल्प महत्वकांक्षी मानला जातो. या प्रकल्पामुळे मराठवाडा-विदर्भाच्या विकासाला तसेच वाहतुक, दळणवळण, उद्योग, व्यापारांना चालना देणारा ठरणार आहे. समद्धी महामार्ग हा रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. या महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे स्टेअरींग फडणवीसांच्या हाती पाहायला मिळाले. त्यावरूनही राज्यभर चर्चा झाली.

Samruddhi Mahamarg
Eknath Khadse News : खडसेंच्या घरात राजकारण; सासू विरुद्ध सून मैदानात

समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी वेगमर्यादा किती?

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) कमाल वेग मर्यादा ही १५० किमी प्रतितास आहे. ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग असून हा महामार्ग सहा पदरी आहे. सध्या नागपूर ते शिर्डी (Shirdi) इथपर्यंत पूर्ण झाला आहे. उर्वरित १८१ किलोमीटर महामार्ग हा पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे.

या महामार्गावर प्रतिदिवस ३० ते ३५ हजार वाहने धावणार आहेत. तसेच ट्राफिक सर्व्हिलन्स, सीसीटीव्ही कॅमेरे देखील या महामार्गावर असणार आहेत. या महामार्गामुळे राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. यामध्ये शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला फायदा होणार आहे.

Samruddhi Mahamarg
Shashi Tharoor : शशी थरुर यांना राष्ट्रवादीची खुली ऑफर

मुंबई ते नागपूर प्रवास १७ तासांवरून ७ तासांवर

समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर (Nagpur) या दरम्यानचा प्रवास हा तब्बल १७ तासांवरून ७ तासांवर येणार आहे. राज्यातील १० जिल्ह्यातील २६ तालुक्यातील ३९१ गावामधून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. तर राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जाणार

नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai) दरम्यान समृद्धी महामार्ग हा राज्यातील १२ जिल्ह्यातून जाणार आहे. त्यामध्ये नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच या महामार्गामुळे जवळपाच्या २६ तालुक्यांच्या वाहतूकीला फायदा होणार आहे.

Samruddhi Mahamarg
Marathwada : नाना पुढाकार घ्या, शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना राईट करा..

महामार्गाच्या बाजूंने ११ लाख वृक्षांची लागवड

समृद्धी महामार्ग हा देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे. कारण या महामार्गाच्या देन्ही बाजूंने तब्बल ११ लाख वृक्ष लावण्यात येणार आहेत. या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पासाठी तब्बल ५५,३५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जितका प्रवास तितका टोल

नागपूर ते शिर्डी या ५२० किमी अंतरात तब्बल १९ टोलनाके उभारण्यात आलेत. त्यामध्ये १.७३ प्रति किमीप्रमाणे ५२० किमी प्रवासासाठी प्रवाशांना अंदाजे ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच प्रत्येक एक्झिट पॉइंटवर टोलनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ११ डिसेंबरला करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या महामार्गाची पाहणी देखील केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com