Mumbai News : माहिम मतदारसंघावरुन एकनाथ शिंदे शिवसेना आणि मनसेत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या प्रचंड दबावतंत्रानंतरही शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांच्यासाठी माहिमची निवडणूक चांगलीच आव्हानात्मक बनली.
पण अखेर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती -मनसेचे सूर जुळल्याचे पाहायला मिळत आहे. माहिममध्ये जे जमलं नाही ते आता शिवडीत भाजपनंं (BJP) घडवून आणलं आहे. शिवडीत भाजपनं मनसेचे उमेदवार आणि राज ठाकरेंचे अत्यंत विश्वासू नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळा नांदगावकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवडी विधानसभा मतदारसंघात चांगलाच चर्चेत आला होता. महायुती याठिकाणी उमेदवार देणार की महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या पराभवासाठी मनसेला पाठिंबा देणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, अखेर याबाबतचा सस्पेन्स संपला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी मंगळवारी (ता.5) भाजपची शिवडीविषयीची भूमिका जाहीर केली. शिवडी येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात मनसेचे (MNS) उमेदवार बाळा नांदगावकर यांना भाजप पाठिंबा देणार असल्याची घोषणा करण्यात आली.येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर यांच्यात कडवी झुंज होणार आहे.
भाजपने शिवडी मतदारसंघात मोठा डाव टाकला आहे.पण थेट मनसेच्या उमेदवारालाच पाठिंबा जाहीर करताना भाजपने हा निर्णय फक्त शिवडी या एकमेव मतदारसंघाकरिताच असणार असल्याचेही आशिष शेलार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी आपण विरोधकांना इथं पाणी पाजल्याशिवाय शांत बसायचं नसल्याचाही उच्चार केला.
आशिष शेलार म्हणाले, मी आता फक्त शिवडीपुरतेच बोलत असून ते राज्यभर नेऊ नका. मागच्यावेळी मी माहीमविषयी बोललो तर तो तुम्ही महाराष्ट्रभर घेऊन गेले. आता भाजपची ही भूमिका केवळ शिवडीपुरतीच मर्यादीत राहणार आहे. आपल्यासमोर एक तर अजय चौधरी अन्यथा बाळा नांदगावकर हे दोनच पर्याय आहे. त्या नोटा वगैरे आपला विषय नाही.हा लोकशाहीचा उत्सव असल्याचेही त्यांनी सांगितलं.
तसेच काही जुने मित्र आहेत. पण त्यांनी आपल्याला संपर्क केला नसल्याचा टोलाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अजय चौधरींना लगावला. याचवेळी त्यांनी उद्धवजी तुम्ही दगाबाजी केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात दगाबाज म्हणून नोंद ठेवायची झाली तर तुमचं नाव पहिलं येईल”, असा हल्लाबोलही भाजपच्या शेलारांनी ठाकरेंवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.