Sunil Tatkare : शिंदेंच्या उमेदवाराचं खळबळजनक विधान; म्हणाले,'तटकरे हे महायुतीला लागलेले कॅन्सर...'

Raigad Mahayuti Politics : महायुतीचा धर्म शिवसेना, भाजपा आणि आरपीआयनं जपला आहे. सुधाकर घारे हे सुनील तटकरेंचं पाप आहे, अशी टीकाही महेंद्र थोरवे यांनी केली. महायुतीचं सरकार आणण्याकरिता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम तटकरे करत असल्याचा आरोपही केला.
Sunil Tatkare Vs Eknath Shinde.jpg
Sunil Tatkare Vs Eknath Shinde.jpgSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : एकीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाविकास आघाडी असो वा महायुती दोन्ही बाजूला मतभेद चव्हाट्यावर येत आहे. जागावाटपावरुन कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळाल्यानंतर आता बंडखोरी, आरोप-प्रत्यारोपांनी नेत्यांमध्ये वाद पेटला आहे.

निवडणुकीला सामोरे जाताना वरिष्ठ नेतेमंडळींकडून सबुरीचा सल्ला दिला जात असतानाच दुसरीकडे स्थानिक पातळीवर कुणीच कुणाशी जुळवून घ्यायला तयार नाही. अशातच आता रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात आता खटके उडाल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महायुतीत रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. कर्जत खालापूर हा विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) आणि अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात थेट लढत होणार आहे.

पण आता विद्यमान आमदार आणि उमेदवार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Sunil Tatkare Vs Eknath Shinde.jpg
Rashtriya Samaj Party News : खळबळजनक! 'रासप'चे उमेदवार गोविंद जेठेवाडा यांचा आत्महत्येचा प्रयत्न

आमदार महेंद्र थोरवे यांनी मंगळवारी (ता.5) पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडताना खासदार सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे असा घणाघात केला आहे. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंना तटकरेंचं मोठं पाठबळ आहे. त्यांनी युतीधर्म मोडला असल्याचा खळबळजनक दावाही आमदार थोरवे यांनी केला आहे.

शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे म्हणाले,रायगड जिल्ह्याचा आजवरचा इतिहास जर आपण पाहिला, तर सुनील तटकरे ज्यांच्याशी गोड बोलले आहे, त्या प्रत्येकाचा त्यांनी काटा काढला आहे.त्यांनी अंतुलेंना राजकीयदृष्ट्या संपवलं.शेकापच्या जयंत पाटलांना संपवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलं.

Sunil Tatkare Vs Eknath Shinde.jpg
Modi-Thackeray Solapur Sabha : मोदी अन् ठाकरे एकाच दिवशी सोलापुरात; विधानसभेच्या प्रचारात रंगणार राजकीय जुगलबंदी

'सुधाकर घारे हे सुनील तटकरेंचं पाप...'

आता ते माझा घात करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तटकरेंना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. माझ्याबरोबर प्रत्येकजण उभा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी महायुतीत यावी हे आम्हाला मान्य नव्हतं. शिवसेना,भाजपा,आरपीआय ही अभेद्य महायुती आहे. ही सक्षमपणे राज्यात उभी आहे, असंही ते म्हणाले. महायुतीकडून लोकसभा निवडणुकीसाठी रायगडची उमेदवारी घोषित झाल्यापासून आम्ही तटकरेंसाठी एकत्रितपणे काम करायला सुरुवात केली. त्यांना विजयही मिळवून दिला.

महायुतीचा धर्म शिवसेना, भाजपा आणि आरपीआयनं जपला आहे. सुधाकर घारे हे सुनील तटकरेंचं पाप आहे, अशी टीकाही महेंद्र थोरवे यांनी केली. महायुतीचं सरकार आणण्याकरिता तिन्ही पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत, त्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचं काम तटकरे करत असल्याचा आरोपही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com