Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Mahayuti New CM : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; फडणवीस नव्हे तर 'या' महिला नेत्याला मुख्यमंत्री करा.. ! कुणी केली मागणी ?

Demand for a woman Chief Minister in Maharashtra politics: विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. पण

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दमदार कामगिरी करत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. भाजपनं 132,एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 41 जागा निवडून आल्या आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 अपक्षांनी महायुतीला (Mahayuti) आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

त्यात 5 अपक्षांनी भाजप तर 3 यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता 288 पैकी महायुतीकडे एकूण 238 आमदारांचं संख्याबळ असतानाही महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावरुन जोरदार टशन सुरू असल्याची चर्चा आहे.याचवेळी आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे.

विधानसभेतील यशामुळे एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा आहे. शिंदे यांच्या नेतृत्वात महायुतीनं निवडणूक लढवली असल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनवण्यावर शिंदेसेनेतील नेतेमंडळी अजूनही ठाम आहेत. तर भाजपला 130 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानं मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा,अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावरुन आता उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान,महायुतीतील तब्बल 178 आमदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला पसंती दिल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यात भाजपचे 132 आमदार आणि पाच अपक्ष तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत, अशी आग्रही मागणी उचलून धरली आहे.

विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. पण याचवेळी भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा,अशी मागणी करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाविषयी केलेल्या विधानामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करावं अशी आम्ही मागणी केली आहे. जर असं झालं नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

'ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको..'

ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेते मंगेश ससाणे यांनी मनोज जरांगेंवरही टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना ओबीसी समाजाने मोठा झटका दिला आहे. या निवडणुकीत महायुतीसाठी ओबीसी समाज निर्णायक ठरला आहे.त्याचमुळे ओबीसी समाजाला मुख्यमंत्री पद देण्यात यावं, अशी भूमिकाही ससाणे यांनी मांडली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळेल अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.त्यावरही ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेते मंगेश ससाणे यांनी थेट भाष्य केलं. ते म्हणाले, लक्ष्मण हाके यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल असं आम्हाला वाटत नाही. पण जर भेटलं तर स्वागत आहे, असंही ते त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT