Devendra Fadnavis: 178 आमदार म्हणताहेत, फडणवीसच मुख्यमंत्री हवेत; तुम्हाला काय वाटतं?

RSS and BJP core committee back Devendra Fadnavis for leadership: राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप कोअर कमिटी फडणवीसांच्या नावाला अनुकूल आहे. त्यांचा या भावना भाजप हायकंमाडला पोहचविण्यात आल्या आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चर्चा रंगत असताना मोठी माहिती समोर येत आहे. 178 आमदारांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावला पसंती दिली आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यांचा स्टाईक रेटसुद्धा जास्त आहे. भाजपसह त्यांना पाठींबा देणारे पाच अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 अशा 178 आमदारांनी फडणवीस हेच मुख्यमंत्री हवेत, अशी आग्रही मागणी केली आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भाजप कोअर कमिटी फडणवीसांच्या नावाला अनुकूल आहे. त्यांचा या भावना भाजप हायकंमाडला पोहचविण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसह पाच अपक्षांनी फडणवीसांना पाठींबा दिल्याने फडणवीसाचे पारडं जड झालं आहे.

2014 मध्ये मोदी लाट असल्यामुळे भाजप सत्तेत आला होता, पण या निवडणुकीत भाजपच्या यशाचे श्रेय फडणवीस यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांनी आखलेल्या रणनीतीमुळे भाजपला 132 जागा मिळाल्या, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांचेच नाव आघाडीवर आहे.

Devendra Fadnavis
Manoj Jarange Factor Impact : जरांगे फॅक्टरचे काय झाले? विधानसभेत मराठा समाजाचे आमदार किती ?

सध्या मुख्यमंत्रिपदावरून चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे पुन्हा हे पद मिळविण्यासाठी इच्छुक आहेत, तर सर्वाधिक 132 जागा मिळविणाऱ्या भाजपा या पदावर दावा ठोकला आहे. भाजप आमदारांनी या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे. ते राज्यपालांची भेट घेणार आहेत. थोड्याच वेळाच ते राजभवनाकडे रवाना होणार आहेत.

Devendra Fadnavis
Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : 21 महिला सांभाळणार विधानसभेचा कारभार; भाजपच्या तब्बल 14 आमदारही लावणार हातभार!

आज (मंगळवारी) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत येणार आहेत. त्यांच्याकडून फडणवीस यांच्या नावाची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य खूप गाजले होते. त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, हे जवळपास निश्चित झाल्याचे सध्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com