Mahayuti Government Sarkarnama
मुंबई

Mahayuti politics : कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! सत्तेत मिळणार वाटा, महामंडळ वाटपाचा फाॅर्म्युला फिक्स!

Corporation posts allocation : महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्ते या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने लवकरच विविध महामंडळांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Jul : राज्यातील महायुती सरकारने अखेर रखडलेल्या महामंडळे आणि विविध महामंडळांवरील पदांच्या वाटपाचा तिढा सोडवला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वाटपासाठी महायुतीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असून, त्यानुसार भाजपला सर्वाधिक वाटा मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला ४८ टक्के, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला २९ टक्के, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला २२ टक्के महामंडळे आणि विविध पदे येणार आहेत. महायुतीतील इतर घटक पक्षांना मिळून केवळ १ टक्का वाटा देण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक महिन्यांपासून महामंडळांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे इच्छुक नेते आणि कार्यकर्ते या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. आता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याने लवकरच विविध महामंडळांवरील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

राज्यातील सत्तेत सर्वाधिक संख्याबळ असल्याने भाजपला या वाटपातही सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यानंतर संख्याबळाच्या आधारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २९ टक्के, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २२ टक्के वाटा निश्चित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीतील लहान घटक पक्षांच्या वाट्याला केवळ १ टक्का हिस्सा आल्याने त्यांच्यात नाराजीची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महामंडळांच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाल्याने महायुतीतील इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT