Girija Raut Allegations : "मातोश्रीवर काळ्या जादूसाठी बंगालचा जादूगार, राऊत त्यामध्ये मास्टर...", शिंदेंच्या नेत्याने टायमिंग साधलं

Sanjay Shirsat on Vinayak Raut : "विनायक राऊत यांनी स्वतःच्या सुनेचे केस कापणे हे अत्यंत भयानक आहे. स्वतः जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला सोबत ठेवतात, दुटप्पी लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. सुनेने गुन्हा दाखल केलाय त्याप्रमाणे सरकारने सुमोटो कारवाईचे आदेश द्यायला पाहिजेत."
Uddhav Thackeray, Vinayak Raut, Sanjay Shirsat
Shiv Sena (UBT) leader Vinayak Raut reacts after serious allegations made by his daughter-in-law Girija Raut, while Sanjay Shirsat intensifies the political row.
Published on
Updated on

Mumbai News, 13 Jul : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांच्याच सुनेने गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांचा मुलगा नगरसेवक गितेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप सून गिरीजा राऊत यांनी केला आहे.

याबाबत गिरीजा राऊत यांनी ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात राऊत दाखल केली आहे. तर त्यांच्या तक्रारीवरून विनायक राऊतांसह त्यांच्या कुटुंबातील लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे.

अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी विनायक राऊतांच्या सुनेच्या प्रकरणावरून थेट ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उबाठा गटाच्या प्रत्येक जणाला अशी बोभाटा करण्याची सवय आहे. मातोश्रीवर काळी जादू करण्यासाठी बंगालचा जादूगार येत असतो आणि विनायक राऊत त्यामध्ये मास्टर आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Vinayak Raut, Sanjay Shirsat
Operation 'L' : आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप! विरोधी पक्षातील 10 आमदार राजीनामा देणार; रणनीती अन् डेडलाईनही ठरली

त्यांच्या या दाव्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवाय राऊत यांनी स्वतःच्या सुनेचे केस कापणे हे अत्यंत भयानक आहे. स्वतः जादूटोण्याच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला सोबत ठेवतात, दुटप्पी लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. सुनेने गुन्हा दाखल केलाय त्याप्रमाणे सरकारने सुमोटो कारवाईचे आदेश द्यायला पाहिजेत, अशी मागणी करक शिरसाट यांनी राऊतांना टार्गेट करत ठाकरेंना घेरण्याचं टायमिंग साधल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, सुनेने आपल्यावर आणि कुटुंबियांवर केलेले आरोप धादांत खोटे आहेत. गितेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर मागील ३ वर्षांपासून त्यांची पत्नी त्यांच्याबरोबर राहत नाही. तक्रारीत २०१८-२२ पर्यंत अघोरी कृत्य केली जात होती, असं लिहिलं आहे. या काळात तिचे आई-वडील तिच्याबरोबर होते.

Uddhav Thackeray, Vinayak Raut, Sanjay Shirsat
Mamata Banerjee Gets Big Relief : पश्चिम बंगालमध्ये डाव फिरला! बंडखोरांचा यू-टर्न? आमदार पुन्हा ममता बॅनर्जींचं नेतृत्व स्विकारणार; माजी मंत्र्याच्या विधानाने खळबळ

मग त्यांनी ताबडतोब तक्रार का केली नाही? असा सवाल करत २०२२ मध्ये झालेल्या अन्यायाची तक्रार २०२६ साली करतायत यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय सून गिरीजा हीने आपल्याकडे तडजोड करताना ३ बीएचके व टेरेस फ्लॅटसह ५ कोटी रूपयांची मागणी केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com