Mahayuti Government Formation : महायुती सरकारच्या सत्ता स्थापनेची सर्व सूत्र दिल्लीतून हालत आहेत. यासाठीच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुरूवारी मध्यरात्री भेट घेतली.
या बैठकीत आगामी सरकारमधील मंत्रिपदांबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) गृह आणि नगरविकाससह इतर महत्वांच्या खात्यांवर दावा केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिंदेंनी दावा केला असला तरी ही खाती भाजप आपल्याकडेच ठेवून घेणार असल्याची माहिती साम टीव्हीला वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे.
तसंच महायुती सरकारचा शपथविधी हा 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या मुहूर्तावर होणार असल्याचीही माहिती आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुख्यमंत्रिपदासह गृह आणि नगरविकास मंत्रालय स्वत:कडे ठेवणार आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं दिलं जाणार असल्याची माहिती आहे. तर अजितदादांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थ खात दिलं जाणार आहे.
दरम्यान, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेणार असून संविधान समोर ठेवून हा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्रिपदाचा पेच सुटला असला तर इतर महत्वाच्या खात्यावरून महायुतीत रस्सीखेच सुरूच असल्याच दिसत आहे.
दरम्यान, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) गृहमंत्री पद कोणाला मिळणार? यावरून रस्सीखेच सुरू असल्याची माहिती आहे. या दोन्ही पक्षांकडून गृहमंत्री पदाची मागणी करण्यात आली आहे. भाजपला मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्री पद मिळावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला, शिवसेनेकडून सुद्धा गृहमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा पेच महायुतीतील नेते आणि भाजपचे वरिष्ठ नेते कसे सोडवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.