Eknath Shinde : शहांच्या भेटीनंतर शिंदे नाराज आहेत का? फडणवीसांनी शेअर केलेल्या फोटोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणाले,...

Eknath Shinde On His Sad Face In Photo With Amit Shah : फोटोत शहांच्या बाजूला उभे असलेले शिंदे धीर गंभीर मुद्रेत दिसतात. या फोटोवरुन सोशल मीडियात नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या फोटाबाबत शिंदेंना विचारण्यात आलं.
Devendra Fadnavis Eknath Shinde
Devendra Fadnavis Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार का, यावर दिल्लीतील महायुतीच्या बैठक शिक्कामोर्तब झाले नाही. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची सुमारे अडीच तास बैठक झाली. बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमित शाह यांच्यासोबतची बैठक सकारात्मक झाल्याचे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. बैठकीचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज असलेले दिसले. एका फोटोत देवेंद्र फडणवीस हे अमित शहांना पुष्पगु्च्छ देत आहेत, त्यांच्या बाजूला उभे असलेल्या एकनाथ शिंदेंचा चेहरा पडलेला फोटोत दिसतो. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांना विचारले असता शिंदेंना त्यावर प्रतिक्रिया दिली.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा फोटो फडणवीस यांनी आपल्या एक्स हॅण्डलवरुन रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पोस्ट केला आहे."महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून या महत्वाच्या लढाईमध्ये जी साथ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली, प्रेरणा दिली याबद्दल त्यांचे आज नवी दिल्ली येथे मनःपूर्वक आभार मानले! यावेळी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, एकनाथ शिंदे, अजित दादा पवार आणि महायुतीचे वरिष्ठ नेते, सहकारी उपस्थित होते," अशी कॅप्शन फडणवीसांनी त्या फोटोला दिली आहे.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Priyanka Gandhi : गांधी घराण्यातील चौथ्या महिला सदस्य म्हणून प्रियांका यांची लोकसभेत 'एन्ट्री'

शिंदे धीर गंभीर मुद्रेत

फडणीसांनी शेअर केलेल्या या फोटोतील सर्व हसत असले तरी शिंदेंच्या चेहऱ्यावर हसू दिसत नाही. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये फडणवीस अमित शहांना पुष्पगुच्छ देताना दिसतात, या फोटोत शहांच्या बाजूला उभे असलेले शिंदे धीर गंभीर मुद्रेत दिसतात. या फोटोवरुन सोशल मीडियात नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या फोटाबाबत शिंदेंना विचारण्यात आलं.

Devendra Fadnavis Eknath Shinde
Raj Thackeray : निकालानंतर EVM बाबत राज ठाकरेंनी उचलले मोठे पाऊल; MNS लागली कामाला

माझा हसरा चेहरा आहे...

"तुम्हाला कधी गंभीर, कधी हसरा...तुम्हीच काय काय ठरवता," असं शिंदे हसत हसत म्हणाले. "आजही मी खुश आहे. जे आम्ही दोन अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेसाठी जे काम केलं, कल्याणकारी योजना दिल्या त्याचा रिझल्ट या निवडणुकीत पाहायला मिळाला. आतापर्यंत कधीच एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या तेवढ्या मिळाल्या. याचा अर्ध काय तर जनता सरकारच्या कामावर खुश आहे. सराकरच्या कामाबद्दल जनता समाधानी आहे. यातच आम्ही समाधानी आहोत. माझा हसरा चेहरा आहे...तो तुम्हाला दिसतोय ना! घाई अजिबात करू नका, मी सगळ्याची काळजी घ्यायला आहे," असे शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com