Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Lok Sabha Election : अखेर महायुतीचं ठरलं ! निवडणूक जिंकण्यासाठी...

Mahayuti Joint programme : संयुक्त पत्रकार परिषदेत महायुती उद्या करणार घोषणा

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव :

Mumbai News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष सज्ज झाले आहेत. अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला तरी तिघांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. शिवाय निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांनी काय करायचे, हेही ठरले आहे. याची घोषणा उद्या महायुतीच्या (Mahayuti) संयुक्त पत्रकार परिषदेत केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप (BJP), शिवसेना (शिंदे गट) (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (NCP) यांची महायुती आहे. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू आहे. असे असले तरी 'मिशन 45' (Mission 45) यावर तिन्ही पक्ष ठाम आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रचार कसा करायचा, याचे नियोजन तिन्ही पक्षांनी केले आहे. लोकसभेसाठी तिन्ही पक्षांचे एकत्रित मेळावे घेण्यावर महायुतीचा भर आहे. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे घेतले जातील. आपापसात काही मतभेद असतील तर त्याची जाहीर वाच्चता न करता सामोपचाराने मिटवले जातील. त्यामुळे एकत्रित मेळावे घेतल्यास कार्यकर्त्यांमध्ये एकी निर्माण होईल. त्याचा चांगला संदेश मतदारांमध्ये जाईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिन्ही पक्षांचा एकत्र मेळावा 14 जानेवारी रोजी होणार आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यातील मेळाव्यासंदर्भातील घोषणा उद्याच्या पत्रकार परिषदेत होण्याची शक्यता आहे. ही लोकसभा निवडणूक सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीसाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा भाजपची सत्ता आल्यास विरोधक संपून जातील, अशी चर्चा आहे. तर भाजपचा पराभव केल्यास किंवा त्यांच्या संख्याबळ घटल्यास भाजपवर वचक असल्याचे स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी आक्रमक प्रचार केला जाणार आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रत्येक नेता, पदाधिकारी, कायकर्ते यांच्यात समन्वय साधला जात आहे. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. काही झाले तरी निवडणूक जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्या त्यामुळे सर्वेक्षणाच्या अंदाजावर अवलंबून न राहता जिंकण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, अशी सूचना भाजपकडून प्रत्येकाला दिली जात आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT