Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचा आजपासून मुंबईत 'ठिय्या'

Mumbai Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 6 मतदारसंघांची मॅरेथान आढावा बैठक...
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

जुई जाधव :

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. मुंबईत लोकसभेच्या 6 जागा असून त्या जिंकण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आजपासून मुंबईत ठिय्या मांडून आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे आजपासून चार दिवस मुंबईत बैठका घेत आहेत. मुंबईतील सहाही लोकसभा (LokSabha Election) मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने (BJP) जबरदस्त व्यूहरचना केली आहे. यासंदर्भात त्यांच्या मॅरेथान बैठकीला सुरुवात झाली आहे.

Chandrashekhar Bawankule
India Alliance : भाजपच्या हिंदुत्वाला कडवे आव्हान; आघाडीने भात्यातून काढला रामबाण, खेळणार हुकमी डाव!

लोकसभेची 2024 ची निवडणूक भाजप आणि विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीसाठी (INDIA Alliance) आरपारची लढाई असणार आहे. काहीही झाले तरी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून आणण्याचे मिशन भाजपचे आहे.

त्यादृष्टीने त्यांनी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यतेखाली मुंबईत मॅरेथॉन बैठकांना सुरुवात झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पदाधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. डिसेंबरमध्ये नागपुरात प्रदेश कार्य समितीची बैठक झाल्यानंतर आता मुंबईमध्ये भाजप अधिक सक्रिय झाला आहे. भाजपच्या 'मिशन 45'साठी हे मोठे पाऊल आहे.

भाजपची मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. पण अजून महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्याचवेळी भाजपकडून मतदारसंघांचा आढावा, तेथील राजकीय समीकरणांचे गणित मांडणे सुरू आहे. त्यामुळे जागावाटपांचा निर्णय केव्हा होणार, याकडे भाजपच्या मित्रपक्षांचे लक्ष लागले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Chandrashekhar Bawankule
Maharashtra Politics : ग्रामीण भागात 'मतपेरणी'साठी भाजपचं नवं 'कौशल्य'...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com